विकृतीचा कळस ! पोर्न पाहण्याचं व्यसन जडलेल्या मुलानं जन्मदात्या आईवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 02:01 PM2018-04-22T14:01:52+5:302018-04-22T14:05:45+5:30

गुजरातमध्येही पोटच्या मुलानं जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची किळसवाणी घटना घडली आहे.

Porn addict rapes 46-year-old mom, arrested in Gujarat | विकृतीचा कळस ! पोर्न पाहण्याचं व्यसन जडलेल्या मुलानं जन्मदात्या आईवर केला बलात्कार

विकृतीचा कळस ! पोर्न पाहण्याचं व्यसन जडलेल्या मुलानं जन्मदात्या आईवर केला बलात्कार

अहमदाबाद- गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. देशाची ही अराजकतेच्या दिशेनं तर वाटलाच नाही ना, अशी शंकाही अनेकांना सतावतेय. कथुआ, उन्नावसारख्या घटनांनी आधीच हृदय हेलावून गेलं आहे. त्यातच आता गुजरातमध्येही पोटच्या मुलानं जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची किळसवाणी घटना घडली आहे.

गुजरातमधल्या पाटण शहरात हा भयंकर प्रकार समोर आला आहे. 22 वर्षीय तरुणाला पोर्न पाहण्याचं व्यसन जडलं होतं. कामावरून घरी आल्यानंतर तो मुलगा दररोज मोबाइलवर पोर्न पाहायचा. एक दिवस रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्यानं स्वतःच्या आईवरच बलात्कार केला. 22 वर्षीय मुलाला 46 वर्षांच्या आईवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

पाटण शहरात राहणारा राहुल हा गुरुवारी रात्री कार्यालयातून घरी परतला. त्याच वेळी रात्रीच्या सुमारास पाणी प्यायचं कारण देत तो थेट आईच्या खोलीत गेला. त्यानंतर त्यानं तिच्यावर अत्याचार केला. राहुलनं आईला स्वतःबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास विचारल्याचं तेच्या आईनं तक्रारीत म्हटलं आहे. पोटच्या मुलानंच आईवर बलात्कार केल्यानं आईला प्रचंड मानसिक धक्का बसलाय. पीडितेनं पती आणि मोठ्या मुलाला या प्रकाराची माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत बलात्काराचा गुन्हा नोंदवला. राहुलला पोलिसांनी अटक केली असून, पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली आहे. 

Web Title: Porn addict rapes 46-year-old mom, arrested in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.