pm narendra modis wife jashodaben attends iftar party in ahmedabad | पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन इफ्तार पार्टीत सहभागी; मुस्लिमांना फळांचं वाटप
पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन इफ्तार पार्टीत सहभागी; मुस्लिमांना फळांचं वाटप

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी बुधवारी अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका इफ्तार पार्टीला सहभागी झाल्या. रिलीफ रोड परिसरात झालेल्या या कार्यक्रमात त्या हिरवी साडी नेसून त्यांना सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बराच वेळ मुस्लिम समुदायाच्या लोकांसोबत घालवला. यावेळी अनेक महिला आणि पुरुषांनी रोजा सोडला. जशोदाबेन यांनी मुस्लिम बांधवांना फळांचं वाटपदेखील केलं. जशोदाबेन या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. 

मुस्लिम समुदायाला रोजा सोडता यावा, यासाठी जशोदाबेन त्यांच्यासोबत खाद्यपदार्थ घेऊन आल्या होत्या. रोजा सोडणाऱ्या बांधवांना जशोदाबेन यांनी खाद्यपदार्थांचं वाटप केलं. जशोदाबेन निवृत्त शिक्षिका आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये जशोदाबेन सहभागी होतात. याआधीही अनेकदा त्यांच्यातील सामाजिक जाणीव दिसून आली आहे.


Web Title: pm narendra modis wife jashodaben attends iftar party in ahmedabad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.