...तर पाकिस्तानचं एकही विमान वाचलं नसतं- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:27 PM2019-03-04T16:27:30+5:302019-03-04T16:30:00+5:30

मोदींची पाकिस्तानसह विरोधकांवर जोरदार टीका

Pm narendra Modi Asked Why Some People Still Want To Question The Forces | ...तर पाकिस्तानचं एकही विमान वाचलं नसतं- पंतप्रधान मोदी

...तर पाकिस्तानचं एकही विमान वाचलं नसतं- पंतप्रधान मोदी

Next

जामनगर: एअर स्ट्राइकवरुन प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार पलटवार केला. दहशतवाद संपावा ही देशवासीयांची इच्छा आहे. त्यासाठी सैन्याची कारवाई सुरू आहे. मात्र काही लोकांना सैन्याच्या कारवाईवर विश्वास नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राफेलच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केलं. हवाई हल्ल्याच्यावेळी आपल्याकडे राफेल विमान असतं, तर आपलं एकही विमान कोसळलं नसतं आणि त्यांचं एकही विमान वाचलं नसतं, असं म्हणत मोदींनी राफेल करारासाठी काँग्रेसनं प्रचंड वेळ घालवल्याची टीका केली. मोदी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.




मोदींनी जामनगरमधील त्यांच्या सभेत पाकिस्तान आणि विरोधी पक्षांवर तोंडसुख घेतलं. 'भारताला उद्ध्वस्त करण्याचा मानस बाळगणाऱ्यांना हा देश सोडणार नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला. 'दहशतवाद हा आजार आहे आणि आम्ही त्या आजाराच्या मूळावर घाव घालत आहोत. शेजारचा देश दहशतवादाचं मूळ आहे. त्यामुळे आम्ही दहशतवादाचा मूळापासून निपटारा करत आहोत,' असं मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर तोफ डागली. विरोधकांचा सैन्यावर विश्वास नाही. मात्र आम्हाला सैन्याचा अभिमान वाटतो, असं त्यांनी म्हटलं. 




यावेळी पंतप्रधानांनी राफेल विमानाचा मुद्दादेखील उपस्थित केला. आज आपल्या हवाई दलाकडे राफेल असतं, तर आपलं एकही विमान जमीनदोस्त झालं नसतं आणि त्यांचं (पाकिस्तानचं) एकही विमान वाचलं नसतं, असं मोदी म्हणाले. आम्हाला दहशतवाद संपवायचा आहे. दहशतवाद संपवणं हेच आमचं ध्येय आहे. मात्र त्यांना केवळ मोदीला संपवायचं आहे, अशी टीका त्यांनी केली. मोदींनी कालही राफेलच्या मुद्यावरुन राहुल गांधींना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी ते राहुल यांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत होते. 

Web Title: Pm narendra Modi Asked Why Some People Still Want To Question The Forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.