मोदी हे विष्णूचे 11वे अवतार; भाजपा नेत्याचा जावईशोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 05:33 PM2018-10-12T17:33:40+5:302018-10-12T17:37:17+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार असल्याचं ट्विट भाजपा नेते अवधूत वाघ यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

PM narendra modi is the 11th Avatar of Lord Vishnu says bjp leader Avadhut Wagh | मोदी हे विष्णूचे 11वे अवतार; भाजपा नेत्याचा जावईशोध

मोदी हे विष्णूचे 11वे अवतार; भाजपा नेत्याचा जावईशोध

googlenewsNext

मुंबई: पंतप्रधाननरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावे अवतार असल्याचं ट्विट भाजपा नेते अवधूत वाघ यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अवधूत वाघ यांनी इंग्रजी आणि मराठीमध्ये हे ट्विट केलं आहे. 




'भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णूचे अकरावे अवतार आहेत', असं भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी हे ट्विट केलं. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. अवधूत वाघ यांच्या विधानाला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. अवधूत वाघ बरेच पक्ष फिरुन आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाकडे फार लक्ष देऊ नये, असं आव्हाड म्हणाले. 

Web Title: PM narendra modi is the 11th Avatar of Lord Vishnu says bjp leader Avadhut Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.