पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'रोड शो'ला वाराणसीत सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:41 PM2019-04-25T17:41:37+5:302019-04-25T17:42:20+5:30

नरेंद्र मोदींच्या 'रोड शो'ला सुरुवात

PM Modi's mega roadshow and 'Ganga aarti' in Varanasi today | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'रोड शो'ला वाराणसीत सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'रोड शो'ला वाराणसीत सुरुवात

Next

वाराणसी : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीवाराणसी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरते आहेत. उद्या म्हणजेच सोमवारी (दि.26) रोजी नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी आज नरेंद्र मोदींनी वाराणशीत 'रोड शो'चे आयोजन केले आहे. 

 नरेंद्र मोदी यांनी 'रोड शो'आधी बनारस हिंदू विश्वविद्यालयात असलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी 'रोड शो'ला सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजपाच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित आहे. तसेच, घटकपक्षातील नेत्यांचा या 'रोड शो'मध्ये सहभाग आहे. हा 'रोड शो' सात किलोमीटरनंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या द्वाराजवळ संपेल. 'रोड शो'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दशाश्वमेद घाटावर गंगा आरतीत सहभागी होणार आहेत. गंगा आरतीनंतर मोदी काशी विश्वनाथाचे दर्शन करणार आहेत.  


नरेंद्र मोदींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत मैं यहां आया नही हूँ, मुझे माँ गंगाने बुलाया हैं, या घोषणेचा वापर केला होता. तसेच, यंदाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधकांना मोदी लाट आजही कायम आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 






Web Title: PM Modi's mega roadshow and 'Ganga aarti' in Varanasi today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.