दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 09:44 AM2018-05-27T09:44:59+5:302018-05-27T13:57:03+5:30

देशातील सर्वाधिक वेगवान मार्ग मानल्या जाणाऱ्या ईस्टर्न पेरिफरल एक्स्प्रेस-वेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. 

pm modi will inaugurate the 135 km eastern peripheral expressway today | दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली - देशातील सर्वाधिक वेगवान मार्ग मानल्या जाणाऱ्या ईस्टर्न पेरिफरल एक्स्प्रेस-वेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले आहे.  हा एक्स्प्रेस वे देशातील पहिला स्मार्ट आणि हरित एक्स्प्रेस-वे आहे. 135 किलोमीटर लांबीच्या असलेल्या या दिल्ली-मेरठ एक्सप्रेस-वेचा पंतप्रधान मोदी आज शुभारंभ केला. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सादरीकरणाद्वारे संपूर्ण एक्स्प्रेस-वेची माहिती पंतप्रधानांना दिली. या एक्स्प्रेस-वेच्या 9 किमी लांब रस्त्याचे उद्घाटन मोदींनी केले. यावेळी मोदींनी 6 किमीपर्यंत रोड शोही केला.

रोड शो सुरू होण्यापूर्वी जेव्हा मोदी आपल्या वाहनातून पुढे जाऊ लागले. तेव्हा अचानक मोदींनी गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी गडकरींना आपल्या गाडीत येण्याचे संकेत दिले. गडकरी यांच्याबरोबर मोदींनी रोड शोची सुरूवात केली.  

दरम्यान, या मार्गावर 120 किमी प्रति तास गतीनं गाडी चालवण्याची परवानगी असल्यानं यास सर्वाधिक वेगवान एक्स्प्रेस वे म्हटले जात आहे. या एक्स्प्रेस वेसाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. राजधानी नवी दिल्लीतील वाहतूक कोंडी समस्येतून प्रवाशांना मुक्तता देण्याच्या योजने अंतर्गत हा एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जात आहे. गाजियाबाद, फरीदाबाद, ग्रेटर नोएडा आणि पलवलला हा एक्स्प्रेस वे जोडला जाणार आहे.  



 

एक्स्प्रेस -वेची वैशिष्ट्यं

- दररोज दिल्लीतून 52,000 वाहनं जाणार नाहीत.

- 11,000 कोटी रुपये खर्च करुन बनवलेला 135 किमी लांब एक्स्प्रसे वे 

- 6 लेन 100 टक्के अॅक्सीस कंट्रोल

- 100 टक्के सोलर उर्जेचा वापर 

- 4 तासांऐवजी आता 72 मिनिटांमध्ये प्रवास 



 





Web Title: pm modi will inaugurate the 135 km eastern peripheral expressway today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.