'या' ठिकाणी 50 मिनिटांत खा तीन पराठे अन् मिळवा आयुष्यभर मोफत !

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 6:20pm

येथील एका हॉटेलमध्ये सर्वात मोठा पराठा मिळतो. त्या पराठ्याचा आकार 1 फूट सहा इंच आहे आणि एक किलो वजन आहे. 

नवी दिल्ली : भारतात असा कोण नसेल की त्याला पराठे आवडणार नाहीत. सकाळच्या नाश्ताची सुरुवातच काहींची पराठे खाऊन होते. पराठा असा खाद्यपदार्थ आहे की, सकाळच्या नाश्तापासून ते रात्रीपर्यंत केव्हाही खाल्ला जाऊ शकतो. त्यामुळे भुकेची काळजी मिटते. पराठ्याचे नाव जरी काढले, तर अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. पराठ्याचे अनेक प्रकार आहेत. दरम्यान, येथील एका हॉटेलमध्ये सर्वात मोठा पराठा मिळतो. त्या पराठ्याचा आकार 1 फूट सहा इंच आहे आणि एक किलो वजन आहे. 

50 मिनिटांत खा तीन पराठे अन् मिळवा आयुष्यभर मोफत दिल्ली-रोहतक बायपासजवळ एक हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव तपस्या पराठा जंक्शन असे आहे. या हॉटेलमध्ये रोज हजारो लोक नाश्ता करण्यासाठी येतात. विशेष म्हणजे, 50 मिनिटांत 3 पराठे तुम्ही येथील हॉटेलमध्ये खाल्ले, तर तुम्हाला आयुष्यभर पराठे मोफत मिळणार आहेत. त्यामुळे अनेक पराठाप्रेमी हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी इकडे धाव घेतात. मात्र एक पराठा खाल्यानंतर हार मानतात. दरम्यान, या हॉटेलची चर्चा सोशल मिडीयात होत आहे.  

पराठे बनविण्यासाठी तुपाचा वापर या हॉटेलमध्ये पराठे बनविण्यासाठी तेलाचा वापर करण्यात येत नाही, तर तुपाचा वापर केला जातो. या हॉटेलला जवळपास दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या ठिकाणी अनेक प्रकारचे पराठे मिळतात. पनीर, स्वीट, छोला, मटर, पालक अशा प्रकारचे अनेक प्रसिद्ध पराठे आहेत. 

संबंधित

राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक 
फूड पार्क प्रकल्पांना आमच्या सरकारने गती दिली :  हरसिमरत कौर बादल 
नागपुरातील १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित
नागपूर जिल्ह्यात दर महिन्याला २१०० टन रेशन धान्याची बचत
अन्न विक्रेत्यांवर केवळ कारवाईचा फास, दंड व शिक्षा नगण्य

राष्ट्रीय कडून आणखी

पाच राज्यांतील निकालानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली 
Vijay Diwas : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनी शूरवीरांच्या शौर्याला केला सलाम
तेलंगणातील सत्ताधारी TRS आमदारांची शिक्षणं पाहून धक्का बसेल!
‘नेट’ परीक्षेच्या केंद्रावर सीसीटीव्ही, जॅमर
कोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री?, उद्या फैसला...

आणखी वाचा