'हे' सात प्रकल्प बदलणार रेल्वेचा चेहरामोहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 12:46 PM2018-08-30T12:46:37+5:302018-08-30T12:53:25+5:30

येत्या काही वर्षांमध्ये रेल्वेमध्ये पूर्ण बदल व्हावा यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काही विशेष मुद्द्यांवर भर देण्याचे निश्चित केले आहे.

Piyush Goyal highlights 7 projects that will transform rail network | 'हे' सात प्रकल्प बदलणार रेल्वेचा चेहरामोहरा

'हे' सात प्रकल्प बदलणार रेल्वेचा चेहरामोहरा

Next

नवी दिल्ली- नव्या रेल्वेमार्गांबरोबररेल्वेच्या आधुनिकीकरणावर आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. येत्या काही वर्षांमध्ये रेल्वेमध्ये पूर्ण बदल व्हावा यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काही विशेष मुद्द्यांवर भर देण्याचे निश्चित केले आहे.

1) वेळापत्रकानुसार रेल्वे धावणे याला प्राधान्य असेल असे पीयूष गोयल यांनी सांगितले. नियोजित वेळेवर रेल्वेने प्रवास करावा यासाठी नियोजन केल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या येण्याजाण्याच्या दैनंदिन वेळेची नोंद स्टेशनमास्तरच्या ऐवजी आता डेटा लॉगर्सकडून होत आहे. त्यामुळे वेळेवर रेल्वे धावण्याच्या प्रमाणात 1 एप्रिल 2018 पासून 73 ते 74 टक्के सुधारणा झाली आहे.

2) प्रत्येक रेल्वेमध्ये जीपीस बसवण्याचा विचारही रेल्वेने केला आहे. त्यामुळे प्रत्येक रेल्वे सध्या नक्की कोठे आहे हे मोबाइलवरही तपासणे शक्य होणार आहे. त्यामुळे ट्रेनचा रिअलटाइम डेटा उपलब्ध होईल.

3) रेल्वेचे पूर्ण विद्युतीकरण केल्यास 2 अब्ज डॉलरची बचत होईल असे भारतीय रेल्वे खात्याचे मत आहे. गोयल यांच्या मते, एका डिझेल इंजिनचे ओवरहॉलिंग करण्याचा खर्च आणि त्याचे इलेक्ट्रीकमध्ये रुपांतर करण्याचा खर्च समानच आहे. त्यामुऴे कोणताही वेगळा निधी न वापरता सर्व इंजिन्सचे इलेक्ट्रीकमध्ये रुपांतर करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे यामुळे प्रदुषणात लक्षणीय घट होईल असाही विश्वास त्यांना वाटतो.

4) रेल्वेचे वेळापत्रक सुधारावे यासाठी स्मार्ट टाइमटेबल तयार करण्याचा विचार करण्यात आलेला आहे.



5) रेल्वेमध्ये एकूणच सुधारणा व्हावी यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. यादृष्टीने रेल्वेने एकेक टप्प्यावर काम सुरु केले आहे. नुकतेच रेल्वेमध्ये स्मार्ट कोचचा वापर सुरु झाला आहे. या स्मार्ट कोचमधील सेन्सरमुळे कोचची तपासणी व त्यातील स्वच्छता करणे सोपे जाणार आहे. 

6) अधिक नवे सिग्नल वापरल्यानंतर रेल्वेचा वेग वाढवण्यास मदत होईल त्याचप्रमाणे 1 लाख 50 हजार पुलांचे ऑडिट करुन त्यांची दुरुस्ती केली जाईल.

7) पुढील सहा ते आठ महिन्यांमध्ये भारतामध्ये 6 हजार रेल्वे स्थानकांवर वायफाय सेव देण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम प्रदेशातील स्थानकांना त्याचा जास्त लाभ होईल.



 

Web Title: Piyush Goyal highlights 7 projects that will transform rail network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.