10 दिवसात 1 रूपयाने कमी झाली पेट्रोलची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 12:11 PM2018-06-08T12:11:54+5:302018-06-08T12:11:54+5:30

दहा दिवसात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Petrol prices down by Rupee 1 in 10 days, diesel rates also dip | 10 दिवसात 1 रूपयाने कमी झाली पेट्रोलची किंमत

10 दिवसात 1 रूपयाने कमी झाली पेट्रोलची किंमत

Next

नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य लोक वैतागले होते. सततच्या किंमत वाढीनंतर काही पैशांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटायला सुरूवात झाली. गेल्या दहा दिवसात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 10 दिवसांमध्ये दररोज काही पैशांनी पेट्रोलच्या किंमती कमी होऊन आता पेट्रोल 1 रूपयाने स्वस्त झालं आहे. तर डिझेल 10 दिवसात 73 पैशांनी कमी झालं आहे. शुक्रवारी दिल्लीमध्ये पेट्रोल 77.42 रूपये प्रती लिटरने मिळतं आहे. 29 मे रोजी पेट्रोलची तिथे किंमत 78.43 रूपये होती. म्हणजेच पेट्रोलची किंमत 1 रूपयाने कमी झाली आहे. दिल्लीत आज डिझेलची किंमत 68.58 रुपये लिटर आहे. 10 दिवस आधी ही किंमत 69.31 रूपये होती. 

मुंबईमध्येही पेट्रोलची किंमत 10 दिवसात 1 रुपयाने कमी झाली आहे. 10 दिवासाआधी मुंबईमध्ये 86.24 रूपये प्रतीलिटरने पेट्रोल मिळत होतं आता 85.24 रूपये प्रतीलिटर किंमतीने पेट्रोल मिळतं आहे. डिझेलच्या किंमतीमध्ये 77 पैशांनी घट झाली असून डिझेल आता 73.02 रूपयांनी मिळतं आहे. 

पेट्रोलचे आजची किंमत
नवी दिल्ली- 77.42 रूपये
कोलकाता- 80.07 रूपये
मुंबई- 85.25 रूपये 
चेन्नई- 80.37 रूपये

डिझेलची आजची किंमत
दिल्ली- 68.58 रूपये
कोलकाता- 71.13 रूपये
मुंबई- 73.02 रूपये
चेन्नई- 72.40 रूपये
 

Web Title: Petrol prices down by Rupee 1 in 10 days, diesel rates also dip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.