पेट्रोल दराचे 'अच्छे दिन' संपले, ५८ दिवसांनी इंधन महागले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 01:00 PM2018-12-13T13:00:03+5:302018-12-13T13:00:35+5:30

निवडणुकांपूर्वी पेट्रोलचे दर कमी होण्यास सुरूवात झाली होती. विशेष म्हणजे गेल्या 2 महिन्यांपासून दैनिक दरकपात काही पैशांमध्ये होत होती

Petrol price 'good days' ended, fuel prices hike after 58 days! | पेट्रोल दराचे 'अच्छे दिन' संपले, ५८ दिवसांनी इंधन महागले!

पेट्रोल दराचे 'अच्छे दिन' संपले, ५८ दिवसांनी इंधन महागले!

Next

मुंबई - निवडणुकांचे निकाल हाती येताच पेट्रोल दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दरकपात सुरू असलेल्या पेट्रोलचे दर आज 9 पैसे ते 30 पैशांनी वाढले आहेत. तर डिझेल दरामध्ये कुठलिही वाढ झाली नाही. त्यामुळे दिल्लीत गुरूवारी पेट्रोल 70.29 रुपये तर डिझेल 64.66 रुपये लिटर एवढे झाले आहे. बुधवारी दिल्लीत पेट्रोल 70.20 पैसे प्रतिलिटर होते. पेट्रोल डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढल्यानंतर ही दरवाढ सुरु झाली आहे. मात्र, पेट्रोल दरवाढीचा हा सिलसिला वाढत जाऊ नये, अशी जनतेची इच्छा आहे.

निवडणुकांपूर्वी पेट्रोलचे दर कमी होण्यास सुरूवात झाली होती. विशेष म्हणजे गेल्या 2 महिन्यांपासून दैनिक दरकपात काही पैशांमध्ये होत होती. मात्र, आज 58 दिवसांनी पेट्रोल दरवाढीला सुरुवात झाली आहे. चेन्नईतर पेट्रोल 12 पैशांनी महागले असून राजधानी मुंबईत लिटरमागे 11 पैशांची पेट्रोल दरवाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलचे दर 75.91 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. तर डिझेल 67.66 रुपये प्रति लिटर झाले आहे. यापूर्वी 16 ऑक्टोबर रोजी पेट्रोलची शेवट दरवाढ झाली होती. त्यादिवशी दिल्लीत 11 पैशांनी पेट्रोल महागले होते. त्यानंतर, सातत्याने पेट्रोलच्या दरात कपात होत गेली. दररोज काही पैशांची कपात होऊन तब्बल 88.34 रुपये प्रति लिटरचा आकडा गाठलेलं पेट्रोल 75.91 रुपयांवर येऊन पोहोचलं आहे. मात्र, आज तब्बल 58 दिवसांनी पेट्रोलची दरवाढ झाल्यामुळे हा दरवाढीचा सिलसिला पुन्हा सुरू होईल का, अशी भीती सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे.
 

Web Title: Petrol price 'good days' ended, fuel prices hike after 58 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.