Petrol and diesel prices in #Delhi are Rs 78.06 per litre and Rs 72.74 per litre respectively | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात, पेट्रोल 15 पैसे, डिझेल 16 पैशांनी स्वस्त
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात, पेट्रोल 15 पैसे, डिझेल 16 पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्या प्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात 15 पैशांची घट होऊन एक लिटर पेट्रोलसाठीमुंबईकरांना आता 83.57 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलच्या दरात 16 पैशांची घट होऊन एक लिटर डिझेलसाठी मुंबईकरांना 76.22 रुपये द्यावे लागणार आहेत.

(सौजन्य - पेट्रोल-डिझेल डॉट कॉम)

दिल्लीत पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी स्वस्त झालं असून, राजधानीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 78.06 रुपये, तर प्रतिलिटर डिझेलसाठी 72.74 रुपये मोजावे लागणार आहेत.


मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.


Web Title: Petrol and diesel prices in #Delhi are Rs 78.06 per litre and Rs 72.74 per litre respectively
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.