नितीश कुमार यांच्याविरोधात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:31 AM2017-09-12T01:31:50+5:302017-09-12T01:32:20+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार १९९१ सालच्या एका प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक अर्जामध्ये गुन्ह्याची माहिती न दिल्याने, त्यांना अपात्र ठरवावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात आली असून, या प्रकरणात निवडणूक आयोगाने चार आठवड्यांत स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Petition against Nitish Kumar | नितीश कुमार यांच्याविरोधात याचिका

नितीश कुमार यांच्याविरोधात याचिका

Next

 नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार १९९१ सालच्या एका प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक अर्जामध्ये गुन्ह्याची माहिती न दिल्याने, त्यांना अपात्र ठरवावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात आली असून, या प्रकरणात निवडणूक आयोगाने चार आठवड्यांत स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
नितीशकुमार यांच्यावर १९९१ साली एका हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ही माहिती निवडणूक अर्ज भरताना दिली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. अ‍ॅड. मनोहरलाल शर्मा यांनी ही याचिका केली आहे. नितीशकुमार यांनी २००४ व २०१२ साली निवडणूक अर्ज भरताना, प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली नाही वा लपविली, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
नितीशकुमार यांनी आपल्या घटनात्मक अधिकारांचा गैरवापर करून, १७ वर्षांनी संबंधित गुन्ह्याची फाइल बंद करण्यास पोलिसांना भाग पाडले, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Petition against Nitish Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.