लोकांकडून ऐकणार त्यांच्या मनातील ‘बात’, मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 04:52 AM2017-11-25T04:52:22+5:302017-11-25T04:53:01+5:30

पोरबंदर : सौराष्ट्रचा भाग यंदा भाजपासाठी कठीण दिसत आहे. बहुधा, हिंदुत्वाचे कार्डही कामाला येणार नाही. कारण, या भागात काँग्रेस जोरदार ताकद दाखवत आहे.

People will listen to their thoughts, talk about fishermen, establish independent ministry for fishermen | लोकांकडून ऐकणार त्यांच्या मनातील ‘बात’, मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करू

लोकांकडून ऐकणार त्यांच्या मनातील ‘बात’, मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करू

googlenewsNext

- विकास मिश्र
पोरबंदर : सौराष्ट्रचा भाग यंदा भाजपासाठी कठीण दिसत आहे. बहुधा, हिंदुत्वाचे कार्डही कामाला येणार नाही. कारण, या भागात काँग्रेस जोरदार ताकद दाखवत आहे. सौराष्ट्रचे सर्वांत मोठे शहर आहे राजकोट आणि मुख्यमंत्री विजय रूपाणी येथील आहेत. ते राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसने येथून इंद्रनील राजगुरू यांना उमेदवारी देऊन भाजपापुढे आव्हान उभे केले आहे. त्यांची प्रतिमाही चांगली आहे. तर, रूपाणी यांची प्रतिमा रबर स्टॅम्पपेक्षा अधिक नाही. काँग्रेस ही निवडणूक जिंकणार, याची खात्री आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय व विधानसभेचे दरवाजे गुजरातच्या जनतेसाठी खुले केले जातील. तुम्ही आम्हाला ‘तुमच्या मनातील बात’ सांगू शकाल. आतापर्यंत हे दरवाजे केवळ श्रीमंतांसाठी उघडले जात होते आणि त्यांचेच ऐकून घेतले जात होते. आपला आवाज कधी सरकारपर्यंत पोहोचलाच नाही,’ असे सांगत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी यांच्यावर शुक्रवारी टीका केली.
काँग्रेसच्या काळात मच्छीमारांना बोटींच्या डिझेलसाठी सबसिडी होती. भाजपाने ती रोखली. उलट नॅनो प्रकल्पासाठी ३३ हजार कोटी दिले, असा हल्ला करत राहुल गांधी म्हणाले की, गुजरातच्या मच्छीमारांना प्रदूषणामुळे मासे पकडण्यासाठी समुद्रात खोलवर जावे लागते. या प्रदूषणाला १० ते १५ उद्योगपती कारणीभूत आहेत. ते सारे मोदी यांचे मित्र आहेत. मच्छीमारांचे काम शेतकºयांच्या कामासारखेच आहे. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे, तर मच्छीमारांसाठी का असू नये? आपल्याला वचन देतो की, असे स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले जाईल.
स्वीकारला राष्ट्रध्वज
सभेआधी राहुल यांनी महात्मा गांधींचे जन्मठिकाण असलेल्या कीर्ती मंदिराला भेट दिली. अहमदाबादमध्ये त्यांनी दलित शक्ती केंद्रालाही भेट दिली. तिथे दलितांनी तयार केलेला भारताचा राष्ट्रध्वज त्यांनी स्वीकारला. तो ध्वज आधी दलितांनी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना देण्याचे ठरविले होते. मात्र ठेवायला जागा नसल्याचे कारण देत त्यांनी तो घेण्यास नकार दिला होता. हा ध्वज १२५ फूट रुंद व ८३.३ फूट उंच अशा आकाराचा आहे.
>राहुल गांधींचे आकर्षण
राजकोट पूर्वमध्ये काँग्रेस पुन्हा वर्चस्व ठेवू शकते. सौराष्ट्रात फिरताना हे स्पष्ट दिसत आहे की, गावात काँग्रेसची पकड चांगली आहे. निश्चितच यात हार्दिक फॅक्टरचाही परिणाम आहे. पण, राहुल गांधी यांच्याबाबत आकर्षण दिसून येत आहे. गावातील लोकांचे असे म्हणणे आहे की, आता काँग्रेसला संधी द्यायला हवी. जैतपूर विधानसभा क्षेत्रात कावडगावमध्ये पटेल समुदायाच्या आराध्य देवीचे खोडलधाम मंदिर सध्या नेत्यांच्या गर्दीने गजबजून गेले आहे. राहुल गांधींपासून ते मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि हार्दिक पटेलपर्यंत नेते येथे येऊन गेले आहेत.

Web Title: People will listen to their thoughts, talk about fishermen, establish independent ministry for fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.