अपघातानंतर रस्त्यावर तडफडत पडला असताना लोकांनी मात्र मदत करण्याऐवजी लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 03:59 PM2017-08-18T15:59:01+5:302017-08-18T16:02:59+5:30

अपघात झाल्यानंतर एक तरुण जवळपास 14 तास रस्त्यावर तडफडत पडला होता

People were robbed instead of helping when the road collapsed after the accident | अपघातानंतर रस्त्यावर तडफडत पडला असताना लोकांनी मात्र मदत करण्याऐवजी लुटले

अपघातानंतर रस्त्यावर तडफडत पडला असताना लोकांनी मात्र मदत करण्याऐवजी लुटले

Next

नवी दिल्ली, दि. 18 - राजधानी दिल्लीमध्ये अपघात झाल्यानंतर एक तरुण जवळपास 14 तास रस्त्यावर तडफडत पडला होता. यावेळी एकही व्यक्ती त्याच्या मदतीसाठी पुढे आली नाही. एक व्यक्ती पाणी पाजण्याच्या बहाण्याने त्याच्याजवळ आला, आणि 15 हजार रुपये चोरी करुन पळ काढला. प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत चोरीचा गुन्हाही नोंद केला आहे. पीडित तरुणाचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला जात आहे. 

पोलीस सध्या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकासोबत मदतीच्या नावे हात साफ करुन पळालेल्या व्यक्तीचाही शोध घेत आहे. जखमी तरुणाने आपल्या जबाबात चोरी झाल्याची माहिती आधी दिली नव्हती असं डीसीपी जतिन नरवाल यांनी सांगितलं आहे. गुरुवारी तपास अधिका-याऐवजी एसीपीने जबाब नोंदवण्याचं काम केलं. 

पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'जखमी तरुणाला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. तो फूटपाथवर झोपला असल्याने कोणाचं त्याच्याकडे लक्ष न गेल्याची शक्यता आहे. त्या परिसरात अनेक व्यसनी लोक फिरत असतात, त्यामुळे तेथून जाणा-या वाहनचालकांनी जखमी तरुणाला त्यांच्यातलाच एक समजलं असावं'. 

सफदरजंग रुग्णालयात नरेंद्रवर उपचार सुरु आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला काही गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर ऑपरेशन करण्यात येणार आहे अशी माहिती पीडित तरुणाच्या भावाने दिली आहे. जर पोलिसांनी अपघातासाठी जबाबदार असलेल्या वाहनचालकाला पकडलं तर उपचार खर्च मिळू शकतो असंही ते बोलले आहेत. 

काय आहे प्रकरण - 
नरेंद्र जयपूरमधील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. 15 ऑगस्टच्या रात्री तो दिल्लीला आला होता. दिल्लीहून आपल्या उत्तर प्रदेशमधील घरी जाण्यासाठी तो काश्मीर गेटवर बस पकडण्यासाठी चालला होता. संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान रिंग रोडवर रस्ता क्रॉस करत असताना एका गाडीने त्याला धडक दिली. अपघात झाल्यानंतर कारचालक काही वेळ थांबला, मात्र नंतर पळ काढला. नरेंद्र रस्त्याच्या शेजारी पडलेला होता. मदतीसाठी याचना करत होता, मात्र कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. 

रात्री तेथून चाललेल्या एका व्यक्तीला त्याने पोलीस कंट्रोल रुमला फोन करायलाही सांगितलं. पण नंतर तो व्यक्तीही तेथून निघून गेला. शेवटी तो बेशुद्ध पडला. त्याच्याकडे 15 हजार रुपये रोख रक्कम होती. 12 हजार बॅगेत ठेवले होते, तर तीन हजार खिशात होते. रात्री एका व्यक्तीने त्यांना पाणी पाजलं होतं, त्यानेच ते पैसे चोरले होते. 

Web Title: People were robbed instead of helping when the road collapsed after the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.