चेन्नई : राजकीय पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा करायच्या आधी अभिनेते कमल हासन हे तामिळनाडूचा दौरा करणार आहेत. चांगला तामिळनाडू हे माझे स्वप्न आहे. पक्ष स्थापन करायच्या आधी त्याचा पाया बळकट करणे महत्त्वाचे आहे. पक्षाचे नाव जाहीर करायची ना गरज आहे ना घाई, असे कमल हासन यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कमल हासन यांचा आज वाढदिवस आहे.
हासन यांनी ‘#मेयम व्हीसल’ हे भ्रष्टाचारविरोधी मोबाइल अ‍ॅप सुरू केले. हे अ‍ॅप व्यासपीठापेक्षा अधिक काही आहे, असे हासन म्हणाले. तुमची ‘ओळख’ काय, असे विचारले असता ते म्हणाले, मी ब्राह्मण असल्याचे नाकारू शकत नाही. त्याबद्दल अभिमान बाळगावा किंवा अपराधी वाटावे, असे काही नाही.
कमल हासन यांनी चाहत्यांना सांगितले होते की, सत्ता उपभोगावी या लालसेने किंवा उत्सुकतेतून मी हे प्रयत्न करीत नाही. एखादी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. आपण एकत्र येऊ न मोठे संकट टाळू शकतो. (वृत्तसंस्था)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.