Parliament Monsoon Session : मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर विरोधकांची चर्चा करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:49 AM2018-07-18T11:49:52+5:302018-07-18T13:52:18+5:30

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.

Parliament Monsoon Session: parliament monsoon session day 1 loksabha rajyasabha bills live update | Parliament Monsoon Session : मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर विरोधकांची चर्चा करण्याची मागणी

Parliament Monsoon Session : मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर विरोधकांची चर्चा करण्याची मागणी

Next

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशन 10 ऑगस्टपर्यंत चालणार असून यामध्ये एकूण 18 बैठका होणार आहेत. सरकारसमोर महत्त्वपूर्ण विधेयकं पारित करण्याचं आव्हान आहे तर दुसरीकडे संसदेत सरकारला चहुबाजूंनी घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक घेऊन पावसाळी अधिवेशनात सहकार्य करण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांना विशेषत: विरोधी पक्षांना केले. 

LIVE UPDATES :
- केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल 
- जमावाकडून होणाऱ्या मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी.
- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी.






























 

Web Title: Parliament Monsoon Session: parliament monsoon session day 1 loksabha rajyasabha bills live update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.