महापालिका पोटनिवडणुकीतील मित्राच्या विजयाचा अत्यानंद जीवावर बेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 12:08 PM2019-06-25T12:08:34+5:302019-06-25T12:09:00+5:30

परभणी महापालिकेतील प्रभाग ११ च्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये एमआयएमच्या उमेदवार अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांचा विजय झाला. फातेमा यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह त्यांच्या निकटवर्तीयांनी एकच जल्लोष केला. मात्र हाच जल्लोष एकाच्या जीवावर बेतला.

parbhani municipal corporation by-election | महापालिका पोटनिवडणुकीतील मित्राच्या विजयाचा अत्यानंद जीवावर बेतला

महापालिका पोटनिवडणुकीतील मित्राच्या विजयाचा अत्यानंद जीवावर बेतला

googlenewsNext

परभणी - निवडणूक म्हटली की, उमेदवारांच्या संपू्र्ण कुटुंबियांसह मित्र आणि नातेवाईक सगळेच उमेदवाराचा प्रचार करत असतात. निवडणुकीच्या काळात जीवाचं रान करून आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. एवढे सगळ करून उमेदवाराचा विजय झाला की, मग असतो जल्लोष. परभणीतही असच काहीस चित्र होते. परंतु, अत्यानंदात एकाला जीव गमवावा लागल्यामुळे विजयाच्या जल्लोषावर विर्जन पडल.

परभणी महापालिकेतील प्रभाग ११ च्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये एमआयएमच्या उमेदवार अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांचा विजय झाला. फातेमा यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह त्यांच्या निकटवर्तीयांनी एकच जल्लोष केला. मात्र हाच जल्लोष एकाच्या जीवावर बेतला. एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका अब्दुल फातेमा यांच्या पतीचे मित्र सय्यद अब्दुल कादीर सय्यद यांचा विजयी रॅलीत हृदयविकाराने मृत्यू झाला. सय्यद अब्दुल यांच्या मृत्यूमुळे परिरसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

परभणीत मनपाच्या दोन जागांसाठी मंगळवारी मतमोजणी झाली. यामध्ये प्रभाग क्रमांक ११ मध्ये अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांचा विजय झाला. त्यांच्या विजयानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी विजयी रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीत सय्यद अब्दुल देखील सामील होते. मित्राच्या बायकोचा विजय झाल्यामुळे त्यांना खूपच आनंद झाला होता. कारण निवडणूक प्रचाराच ते सुरुवातीपासून आपल्या मित्रासोबत होते.

रॅलीत असतानाच अब्दुल सय्यद यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अत्यानंदातून आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: parbhani municipal corporation by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.