दहा महिन्यांत ७३० वेळा पाककडून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 02:27 AM2017-12-04T02:27:42+5:302017-12-04T02:28:42+5:30

पाकिस्तानने या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ७३० वेळा युद्धविरामाचे उल्लंघन केले. गेल्या सात वर्षांत हे सर्वात जास्त वेळा झालेले उल्लंघन आहे.

Pakistanis firing 730 times in ten months | दहा महिन्यांत ७३० वेळा पाककडून गोळीबार

दहा महिन्यांत ७३० वेळा पाककडून गोळीबार

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानने या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ७३० वेळा युद्धविरामाचे उल्लंघन केले. गेल्या सात वर्षांत हे सर्वात जास्त वेळा झालेले उल्लंघन आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने गोळा केलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने गेल्या आॅक्टोबरपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर युद्धविरामाचे ७२४ वेळा उल्लंघन केले. गेल्या वर्षी आॅक्टोबरपर्यंत ४४९ वेळा युद्धविरामाचे उल्लंघन झाले होते. गेल्या आॅक्टोबरपर्यंत त्यात १२ नागरिक आणि १७ सुरक्षादल कर्मचारी यात मरण पावले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ७९ नागरिक व ६७ सुरक्षादल कर्मचारी जखमी झाले.
भारताची पाकिस्तानला लागून ३,३२३ किलोमीटर लांब सीमा असून, त्यापैकी २२१ किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आणि ७४० किलोमीटरची नियंत्रण रेषा जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. २०१६ मध्ये ४४९ वेळा युद्धविरामाचे उल्लंघन झाले. त्यात १३ नागरिक व १३ सुरक्षादल कर्मचारी ठार झाले.

Web Title: Pakistanis firing 730 times in ten months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.