पाकिस्तानला सतावतेय युद्धाची भीती, सियालकोट बॉर्डरवर वाढवले टँक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 10:28 AM2019-02-22T10:28:20+5:302019-02-22T10:28:39+5:30

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे.

pakistani tanks moving towards sailkot border for counter attack if india attack | पाकिस्तानला सतावतेय युद्धाची भीती, सियालकोट बॉर्डरवर वाढवले टँक

पाकिस्तानला सतावतेय युद्धाची भीती, सियालकोट बॉर्डरवर वाढवले टँक

Next

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. भारतही पाकिस्तानवर कोणत्या तरी मोठ्या कारवाईच्या पवित्र्यात असल्याची भीती पाकिस्तानला सतावते आहे. त्यामुळे पाकिस्तान फारच घाबरला असून, त्यानंतर LOCजवळ सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच सियालकोट बॉर्डरजवळ स्वतःचे टँक पाठवले आहेत.

 एका पाकिस्तानी ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोहम्मद साद नावाच्या व्यक्तीनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानानं पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक गावांना रिकामी केलं आहे, तसेच इतर लोकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरील लोकांचं ये-जा करणं थांबवलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधल्या 127 गावांना हाय अलर्ट जारी केला आहे.  LoCजवळच्या 40 गावांना रिकामी केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरलं आहे. भारतीय शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत भारतानं पाकिस्तानला दिले आहेत. तत्पूर्वी पाकिस्ताननं दहशतवादी मसूद अझहरला बहावलपूर हेडक्वॉर्टरवरून हटवून दुसरीकडे पाठवलं आहे. पाकिस्तान सरकारनं मसूद अझहरला रावळपिंडीतल्या एका सुरक्षित ठिकाणी पाठवलं आहे. रावळपिंडीमध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIचं हेडक्वॉर्टर आहे.


उरी येथील हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच यावेळीही कारवाई होण्याची शक्यता पाहून पाकिस्तानचा भीतीने थरकाप उडाला असून, पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ असलेले दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड रिकामे करून दहशतवाद्यांना सैनिक तळांमध्ये नेल्याचे वृत्त आहे. पुलवामा येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैश ए मोहम्मद विरोधात कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आल्याची घोषणा केली होती. तसेच लष्करानेही या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भारताकडून कारवाईसाठी सुरू असलेल्या मोर्चेबांधणीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळच्या आपल्या विंटर पोस्ट खाली केलेल्या नाहीत. काश्मीरमधील बोचऱ्या हिवाळ्यामुळे या काळात विंटर पोस्ट खाली केल्या जातात. मात्र सध्या तेथे पाकिस्तानी सैनिक तैनात आहेत. 

 सीमारेषेच्या दोन्ही बाजूला तणावाचे वातावरण आहे. मात्र अद्याप लष्कराची तैनाती झालेली नाही, अशी माहिती काश्मीरमधील गुप्तचर खात्यामधील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेपलिकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवर कारवाई करण्याचा भारताची इरादा नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पर्यायच भारतीय लष्कराकडे उरतो. मात्र अशा कारवाईमुळे तणाव अधिकच वाढू शकतो. 

Web Title: pakistani tanks moving towards sailkot border for counter attack if india attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.