Pakistani Air Force conducting Pak army | पाकिस्तानी सीमेलगत भारतीय हवाई दलाने केला कसून सराव
पाकिस्तानी सीमेलगत भारतीय हवाई दलाने केला कसून सराव

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने गुरुवारी रात्री पाकिस्तानी सीमारेषेलगत कसून सराव केला. अनेक लढाऊ विमाने या सरावात सहभागी होते. अमृतसर आणि पंजाबमधील सीमारेषेवर या विमानांचं उड्डाण करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सीमारेषेवर तणाव आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याची शक्यता असल्यानेच हा सराव करण्यात आला. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अमृतसरसहित सीमारेषेवरील जिल्ह्यांमध्ये सुपरसॉनिक गतीने उड्डाण घेत तयारीचा आढावा घेतला. यावेळी फ्रंटलाइन फायटर प्लेनही सहभागी झाले होते. पाकिस्तानी हवाई दल पुन्हा भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करु शकते. यादृष्टीने चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून हा सराव करण्यात आला. १३ मार्चला दोन पाकिस्तानी फायटर विमानांनी रात्री जम्मू- काश्मीरमधील हद्दीजवळून
उड्डाण केले होते.


Web Title: Pakistani Air Force conducting Pak army
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.