सुंजवां हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार - निर्मला सीतारमण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 09:31 AM2018-02-13T09:31:20+5:302018-02-13T10:47:14+5:30

जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.

Pakistan will have to pay for misadventure says defence minister nirmala sitharaman | सुंजवां हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार - निर्मला सीतारमण

सुंजवां हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार - निर्मला सीतारमण

googlenewsNext

श्रीनगर - जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. सुंजवां येथील लष्कर तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 6 जवान शहीद झाले होते आणि काही जण जखमीदेखील झाले होते. सीतारमण यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी सीतारमण यांनी पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच दिला. पत्रकार परिषद घेत सीतारमण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ''सुंजवांमधील हल्ला हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने घडवून आणला आहे. भारत पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येकवेळी पुरावा देत आहे. मात्र, याची फिकीर पाकिस्तानला नाही त्यामुळे त्यांना आता याची किंमत चुकवावी लागेल'', असे सीतारमण यांनी यावेळी म्हटले. 

सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वपूर्ण मुद्दे
1 -  सुंजवां येथील लष्करी तळावर ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यांना पाकिस्तानातून मदत करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे
2 - जैश-ए-मोहम्महदच्या ज्या दहशतवाद्यांना हल्ला केला, त्या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच भारतात घुसखोरी केली असावी. स्थानिक नागरिकांकडून घुसखोरीसाठी मदत मिळाल्याचंही शक्यता वर्तवण्यता येत आहे.  
3 - दहशतवादी आता कमजोर घटकांना टार्गेट करू शकतात. यासाठी सुंजवांतील लष्करी तळावर फॅमिली क्वॉटर्स परिसरातही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
4 - पाकपुरस्कृत दहशतवादी कारवाया आता पीर पंजाल रेंजच्याही पुढे पसरत चालल्या आहेत. शिवाय, भारतात दहशतवाद्यांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप सीतारामण यांनी केला आहे. 
5 - पाकिस्तानाकडून वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्यांना आणि आमच्या देशात हिंसा पसरवण्यासाठी प्रयत्न करणा-यांना सडेतोड उत्तर देऊ - निर्मला सीतारमण
6 - या हल्ल्यानंतर सर्व पुरावे गोळा केलेले आहेत आणि एनआयएकडून याबाबत चौकशी करण्यात येत आहे.  
7 - या सर्व पुराव्यांना पाकिस्तानकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. कित्येक पुरावे, अहवाल सोपवल्यानंतरही पाकिस्ताननं तेथील दहशतवाद्यांविरोधात कोणतेही ठोस पाऊल उचलत कारवाई केलेली नाही. 
8 - भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचं वारंवार समोर आले आहे. 
9 - आता सीमारेषेवर अत्याधुनिक शस्त्रांसहीत सैन्य तैनात केले जाणार आहे आणि देखरेखदेखीव वाढवण्यात येईल.
10 - शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागणार आहे.
 



 



 



 



 



 



 



 

Web Title: Pakistan will have to pay for misadventure says defence minister nirmala sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.