Pakistan again violates ceasefire, two Indian soldiers martyred | सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, भारताचे दोन जवान शहीद
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, भारताचे दोन जवान शहीद

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय जवान अन् पाकिस्तानी रेंजर्संमध्ये चकमक सुरू आहेत. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. एकीकडे पंतप्रधान इम्रान खान भारतासोबत युद्ध नको, अशी भाषा करतात. मात्र, दुसरीकडे त्यांचे लष्कर भारतीय सैनिकांवर गोळीबार करतात. गुरुवारी कुपवाडा जिल्ह्यातील माछिल परिसरात झालेल्या या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. 

काश्मीर खोऱ्यात सीमारेषेवरील राजौरी जिल्ह्यात सुंदरबनी सेक्टर येथे सायंकाळी 5 वाजल्यापासून भारतीय सैन्य अन् पाकिस्तानी रेंजर्संमध्ये गोळीबार सुरु आहे. या गोळीबारात एस सैनिक आणि एका बीएसफ जवानास वीरमरण आले आहे. कॅप्टन प्रसनजीत यांचा उपचारादरम्यान, रुग्णालयात मृत्यू झाला. तर कमलकोटे परिसरातील नागरिकांच्या घरांचेही या गोळीबारात नुकसान झाले आहे. दरम्यान, भारतीय सैन्यानेही पाकिस्तानी रेंजर्संना जशास तसे उत्तर दिले असून अद्यापही चकमक सुरूच आहे. Web Title: Pakistan again violates ceasefire, two Indian soldiers martyred
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.