भारताच्या ४० चौक्यांवर पाकने केला गोळीबार, एक जवान शहीद; २ स्थानिकांचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 03:37 AM2018-01-20T03:37:34+5:302018-01-20T03:37:36+5:30

जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी केलेल्या

Pak firing, 40 killed in 40 Indian posts; 2 death toll | भारताच्या ४० चौक्यांवर पाकने केला गोळीबार, एक जवान शहीद; २ स्थानिकांचाही मृत्यू

भारताच्या ४० चौक्यांवर पाकने केला गोळीबार, एक जवान शहीद; २ स्थानिकांचाही मृत्यू

Next

नवी दिल्ली : जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी केलेल्या उखळी तोफगोळ््यांच्या मा-यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर दोन स्थानिक मरण पावले. पाकच्या या आगळीकीला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी भारताच्या ४0 चौक्यांवर गोळीबार केला. त्यामुळे तेथील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, लोकांना घराबाहेर न पडण्याचे तसेच शक्यतो तेथून स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जम्मू, सांबा, कठुआ या तीन जिल्ह्यांच्या सीमाभागात पाकने आगळीक केली आहे. राजौरी जिल्ह्यातही सकाळपासून पाकिस्तानी सैनिकांनी उखळी तोफांचा मारा सुरू केला. बीएसएफच्या तीन चौक्यांना पाकिस्तानी सैनिकांनी लक्ष्य केले आहे. त्यात बीएसएफचे हेडकॉन्स्टेबल जगपाल सिंग हे शहीद झाले, तर दोन जवानही जखमी झाले.
अन्य दोन स्थानिकही मरण पावले. पाकच्या हल्ल्यांत कठुआ जिल्ह्यात नऊ, जम्मू जिल्ह्यातील आठ व सांबा जिल्ह्यातील चार असे २३ जण जखमी झाले असून त्यातील १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वत: शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाºया पाकिस्तानने प्रत्यक्षात भारताकडून आमच्यावर गोळीबार सुरू आहे, असा कांगावा सुरू केला आहे. भारताच्या माºयात पाकिस्तानी नागरिक ठार झाले आहेत, असा कांगावा करून भारताचे पाकिस्तानातील उपउच्चायुक्त जे. पी. सिंग यांना बोलावून घेण्यात आले. गेल्या दोन दिवसांत जे.पी. सिंग यांना दोनदा बोलावण्यात आले आहे.
चोख प्रत्युत्तर देऊ - सुभाष भामरे
पाकिस्तानला कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर द्यायचे, हे भारतीय लष्कराला व्यवस्थित ठाऊक आहे व त्यासाठी लष्कर संपूर्ण सज्ज आहे, असे
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष
भामरे यांनी म्हटले आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रकारही घडत असून ते रोखण्यात येतील असेही ते पुढे म्हणाले.

Web Title: Pak firing, 40 killed in 40 Indian posts; 2 death toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.