लाच प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात गदारोळ, सरन्यायाधीशांनी बदलला दोन न्यायाधीशांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 5:01am

सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडून अनुकूल आदेश मिळविण्यासाठी ओडिसा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाने लाच घेतल्याच्या आरोपाची पाच ज्येष्ठ न्यायाधीशांच्या घटनापीठाने तातडीने सुनावणी

नवी दिल्ली : सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडून अनुकूल आदेश मिळविण्यासाठी ओडिसा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाने लाच घेतल्याच्या आरोपाची पाच ज्येष्ठ न्यायाधीशांच्या घटनापीठाने तातडीने सुनावणी करण्याचे दोन न्यायमूर्तीच्या पीठाने गुरुवारी दिलेले आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाने शुक्रवारी रद्द ठरवले. या प्रकरणात सरन्यायाधीशांचे नाव असल्याने ते वगळून पाच ज्येष्ठ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे त्याची सुनावणी व्हावी, असे न्या. चेल्लमेश्वर व न्या. अब्दुल नझीर यांनी म्हटले होते. पण पीठावर कोण असावेत, हा पूर्णत: सरन्यायाधीशांचा निर्णय असल्याने गुरुवारचा आदेश बदलण्याचा निर्णय सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. आर. के. अग्रवाल, न्या. अजय खानविलकर, न्या. अरुण मिश्रा व न्या. अमिताभ रॉय यांच्या पीठाने घेतला. प्रकरणे कोणत्या पीठापुढे द्यायचे याचा विशेषाधिकार सरन्यायाधीशांना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित

वादग्रस्त विधान प्रकरणी संभाजी भिडे यांना जामीन मंजूर
संबंधित न्यायाधीशांची बदली करण्याची मागणी
कर्जाच्या परतफेडीचा धनादेश अनादरित; सहा लाखांचा दंड
जिल्हा न्यायालयात महापरिनिर्वाण दिन
अमिताभ बच्चन यांच्याविरूद्धचा फौजदारी दावा फेटाळला

राष्ट्रीय कडून आणखी

मोदी सरकार शेतकऱ्यांना लोढणे समजते : राहुल गांधी
कार्यकाळ पूर्ण न करणारे दुसरे गव्हर्नर; १९९० नंतर सर्वात कमी काळ सेवा
'जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल व वीजही येणे आवश्यक'
देशातील ९० टक्के घरांत एलपीजी - धर्मेंद्र प्रधान
‘चाइल्ड लॉक’ यंत्रणेला मिळाला रेड सिग्नल

आणखी वाचा