One student died, 25 injured in Jaliktu sport in Tamil Nadu | तामिळनाडूमधल्या जलीकट्टू खेळादरम्यान एका प्रेक्षकाचा मृत्यू, 25 जखमी
तामिळनाडूमधल्या जलीकट्टू खेळादरम्यान एका प्रेक्षकाचा मृत्यू, 25 जखमी

चेन्नई- तामिळनाडूमधल्या मदुराई येथे जलीकट्टू खेळादरम्यान एका प्रेक्षकाचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत. त्यातील 6 जणांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या जीवघेण्या खेळात डिंडीगुल इथल्या सनारपट्टी भागातल्या 19 वर्षीय एस कलिमुथु या प्रेक्षकाचा मृत्यू झाला. उधळलेल्या बैलानं जलीकट्टू खेळ पाहण्यासाठी आलेल्या कलिमुथुसह अनेक लोकांवर हल्ला चढवला. यात कलिमुथु या प्रेक्षकाचा मृत्यू झाला. या वर्षीच्या खेळाचा तामिळनाडूतील हा पहिला बळी आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडलेल्या या जलीकट्टू खेळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या वादग्रस्त खेळाचं आयोजन तामिळनाडूमधल्या मदुराई येथे करण्यात आलं होतं. दक्षिण भारतात साजरा करण्यात येणा-या पोंगल या सणाच्या दरम्यानच जलीकट्टूचं आयोजन करण्यात येतं.


Web Title: One student died, 25 injured in Jaliktu sport in Tamil Nadu
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.