बिहारमध्ये शाळेच्या बसला अपघात; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 20 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 07:29 AM2018-10-23T07:29:01+5:302018-10-23T07:31:22+5:30

शैक्षणिक सहलीवरुन परतत असताना बसची ट्रकला धडक

One student dead 20 injured in bus truck collision in bihars aurangabad | बिहारमध्ये शाळेच्या बसला अपघात; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 20 जखमी

बिहारमध्ये शाळेच्या बसला अपघात; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 20 जखमी

Next

पाटणा: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात शाळेच्या बसला झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशीरा हा अपघात झाला. विद्यार्थ्यांची बस एका शैक्षणिक सहलीवरुन परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील जखमींवर सध्या जमुईमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 




औरंगाबाद जिल्ह्याच्या मंगरोली गावातील उर्दू माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक सहलीनिमित्त राजगीरला गेले होते. तिथून परतत असताना त्यांच्या बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 वर अपघात झाला. बसनं रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. बारुण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. 




अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जमुईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या हे सहा विद्यार्थी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. या अपघातात राजपूरच्या मंगरवालिया येथे राहणाऱ्या मजहरचा (14 वर्षे) मृत्यू झाला आहे. 



 

Web Title: One student dead 20 injured in bus truck collision in bihars aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.