शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 09:43 PM2018-10-14T21:43:47+5:302018-10-14T23:42:27+5:30

शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळल्यानं ढिगा-याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला आहे.

UP: One dead, 14 rescued as roof of under-construction building collapses in Shahjahanpur | शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Next

उत्तर प्रदेश- शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळल्यानं ढिगा-याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची टीम पोहोचली आहे. बचाव पथकानं पोलिसांच्या मदतीनं 15 लोकांना ढिगा-याखालून बाहेर काढलं आहे. परंतु या दरम्यान तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. आताही या इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक मजूर दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, इमारतीत जवळपास 60 मजूर काम करत होते. बचाव कार्याला गती प्राप्त झाली असून, लखनऊमधून एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी रवान्या झाल्या आहेत. इमारतीच्या बाहेरील भिंती तोडून मजुरांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.








घटनास्थळी शाहजहांपूरचे डीएम आणि एसपी पोहोचले आहेत. निर्माणाधीन इमारतीमध्ये मोठा हॉल होता. त्याला पिलरचा आधार नव्हता. तो ढासळल्यानंतरच पूर्ण इमारती कोसळली आहे. आम्ही इमारतीच्या ढिगा-याखाली दबले गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं एका अधिका-यानं सांगितलं आहे. इमारत कोसळल्यानंतर ठेकेदार फरार झाला आहे. तर आजूबाजूची माणसेही बचावकार्याला मदत करत आहेत. या ढिगा-याखाली अनेक मजूर दबले गेल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. ही घटना आरसी मिशन इथल्या बाबा हॉटेलजवळ घडली आहे. इथे एका डिग्री कॉलेजसाठीच्या इमारतीची बांधणी सुरू होती. 

Web Title: UP: One dead, 14 rescued as roof of under-construction building collapses in Shahjahanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.