ठळक मुद्देकुलभूषण जाधव यांची सुटका करण्यासाठी दहशतवाद्याला सोडण्यास तयार असून अदलाबदली करण्याची ऑफर दिल्याचा पाकिस्तानचा दावा पाकिस्तानने आपल्या लांबलचक यादीत अजून एक काल्पनिक खोटं जोडलं आहे अशी भारताकडून टीकाअफगाणिस्तानने अशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे

नवी दिल्ली - भारताने शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडा पाहत खडे बोल सुनावले आहेत. कुलभूषण जाधव यांची सुटका करण्यासाठी भारताने पेशावर आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला करण्या-या दहशतवाद्याला सोडण्यास तयार असून अदलाबदली करण्याची ऑफर दिल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. भारताने पाकिस्तानचा खोटारेडपणा उघड करत हे पाकिस्तानचं अजून एक काल्पनिक खोटं आहे असं सांगितलं आहे. 

'अफगाण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कार्यालयाकडून जारी करण्यात आलेली प्रेस रिलीज तुम्ही सर्वांनी पाहिली आहे. प्रेस रिलीज पाहिली तर पाकिस्तानने आपल्या लांबलचक यादीत अजून एक काल्पनिक खोटं जोडलं आहे. पाकिस्तानने अजून एक आपण स्वत: रचलेली स्टोरी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे', असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार बोलले आहेत. 

'संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काय झालं हेदेखील तुम्ही सर्वांनी पाहिलं आङे. कशाप्रकारे भारताचा सांगत दुस-या देशातील महिलेचा फोटो दाखवून खोटं बोलण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्या या खोटारडेपणाच्या यादीत अजून एक स्टोरी आली आहे', असं रवीश कुमार यांनी सांगितलं आहे. 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या दाव्यानुसार, कुलभूषण जाधव यांच्या मोबदल्यात 2014 पेशावर आर्मी पब्लिक स्कूलवरील हल्ल्यात सहभागी दहशतवाद्याची सुटका करण्याची ऑफर पाकिस्तानला मिळाली आहे. दहशतवादी सध्या अफगाणिस्तानच्या ताब्यात आहे. 

न्यूयॉर्कमधील एशिया सोसायटी कार्यक्रमात बोलताना ख्वाजा आसिफ यांनी दावा केला होता की, 'अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने मला सांगितलं की, पेशावर हल्ल्यातील दहशतवाद्याच्या बदली तुमच्याकडे असलेला दहशतवादी कुलभूषण जाधव आम्हाला द्या'. यावेळी ख्वाजा आसिफ यांनी दहशतवाद्याचं नावं घेतलं नव्हता. सोबतच त्यांना ही ऑफर नेमकी कधी मिळाली होती हेदेखील स्पष्ट केलं नव्हतं. 

अफगाणिस्तान लष्कराने कारवाई करत तेहरीक-ए-तालिबानचा प्रमुख मुल्लाह फजलुल्लाह याला अटक केली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद हनीफ अतमर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 21 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत भारत किंवा कोणत्याही भारतीय नागरिकाचा उल्लेख झाला नव्हता हे स्पष्ट केलं आहे.