अश्लीलता आणि सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत - हायकोर्ट   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 09:13 AM2018-06-22T09:13:09+5:302018-06-22T09:13:09+5:30

ज्याप्रकारे सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते त्याच प्रमाणे अश्लीलताही सुद्धा बघणाऱ्यांच्या नजरेतच असते, अशी टिप्पणी केरळ हायकोर्टाने केली आहे.

Obscenity & beauty are in the eyes of those who see - High Court | अश्लीलता आणि सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत - हायकोर्ट   

अश्लीलता आणि सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत - हायकोर्ट   

Next

तिरुवनंतपूरम - ज्याप्रकारे सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते त्याच प्रमाणे अश्लीलताही सुद्धा बघणाऱ्यांच्या नजरेतच असते, अशी टिप्पणी केरळ हायकोर्टाने केली आहे. मल्याळम मासिक गृहलक्ष्मीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहेत. तसेच मासिकाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. 

 गुरुवारी या प्रकरणी  निकाल सुनावताना न्यायालयाने गृहलक्ष्मी मासिकाविरोधातील याचिका फेटाळून लावली. ज्याप्रकारे सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते त्याच प्रमाणे अश्लीलताही सुद्धा बघणाऱ्यांच्या नजरेतच असते. या छायाचित्रात काही अश्लील आहे असे आम्हाला वाटत नाही. तसेच छायाचित्राला दिलेल्या कॅप्शनमध्येही पुरुषांसाठी काही आक्षेपार्ह टिप्पणी आहे, असे आम्हाला वाटत नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली. 

गृहलक्ष्मी या मासिकाने मार्च महिन्यातील आपल्या अंकात नवजात मुलाला स्तनपान करत असेल्या महिलेचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. या छायाचित्रात पेशाने एअरहॉस्टेस असलेली आणि मॉडेल व लेखिका म्हणून काम पाहणारी गिलू जोसेफ ही मुलाला स्तनपान करत दिसत होती. तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांकडे रोखून पाहणाऱ्यांना मुखपृष्ठावरून एक संदेशही देण्यात आला होता. केरळला माता सांगत आहेत की, कृपया आमच्याकडे रोखून पाहू नका, आम्हाला स्तनपानाची गरज आहे, असे या संदेशात म्हटले होते. 


हे छायाचित्र प्रकाशित झाल्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला होता. तसेच हे छायाचित्र कामुक असून, धार्मिक आणि सांप्रदायिक भावना दुखावणारे असल्याचे आरोप करण्यात आले होते. या छायाचित्राविरोधात केरळमधील कोल्लमच्या सीजेएम कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. तसेच गृहलक्ष्मी या मासिकाविरोधात पॉक्सो कायदा आणि जुवेलनाइल जस्टिस अॅक्टच्या कलम 45 आणि महिला अश्लीलता प्रतिनिधित्व अधिनियम 1986 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान,  एंटोनी डोमिनिक आणि डामा शेषाद्री नायडू यांच्या खंडपीठाने निकाल देताना सांगितले की, "भारतीय कलेने नेहमीच मनुष्याच्या शरीराचे सौंदर्य दाखवले आहे. मग कामसूत्र असो वा राजा रविवर्माची चित्रे वा अजंठा येथील शिल्पे. पूर्वीच्या जमान्यातील लोक आपल्यापेक्षा अधिक समजुतदार होते." दरम्यान ही याचिका दाखल करणारे वकील विनोद मॅथ्यू यांनी म्हटले होते की, हे छायाचित्र खूप कामूक असून, महिलांना कमीपणा दाखवणारे आहे. तसेच ख्रिश्चन महिलेने मंगळसूत्र आणि कुंकू लावण्यालाही आक्षेप घेण्यात आला होता.   

Web Title: Obscenity & beauty are in the eyes of those who see - High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.