विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 02:34 PM2017-08-17T14:34:50+5:302017-08-17T14:39:08+5:30

भारतात येणा-या विदेशी पर्यटकांसाठी केंद्र सरकारकडून ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतात येणा-या पर्टकांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

The number of foreign tourists increased by 15 percent | विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ

विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसादपर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ बांगलादेशचे पर्यटक जास्त

नवी दिल्ली, दि. 17 -  भारतात येणा-या  विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ झाल्याती माहिती केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. भारतात येणा-या विदेशी पर्यटकांसाठी केंद्र सरकारकडून ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतात येणा-या पर्टकांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
पर्यटन मंत्रिमंडळाकडून यासंदर्भात एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये यावर्षी जानेवारी ते जुलै या महिन्यात भारतात आलेल्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ झाली आहे, असे म्हटले आहे. विदेशी देशांपैकी भारतात येणारा पर्यटकांमध्ये बांगलादेशचे पर्यटक जास्त आहेत. त्यापाठोपाठ अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे. गेल्या जुलै महिन्यात बांगलादेशातून 20.12 टक्के, अमेरिकेतून 16.26 टक्के, ब्रिटनमधून 10.88 टक्के आणि फ्रान्समधून 3.01 टक्के पर्यटक भारतात आले आहेत.  
जानेवारी ते जुलै 2017 मध्ये 56.74 लाख पर्यटक भारतात आले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 49.30 लाख पर्यटक आल्याची नोंद पर्यटन मंत्रालयाकडे आहे. याचबरोबर, गेल्या जुलै महिन्यात 7.88 लाख विदेशी पर्यटक भारतात आले. तर गेल्यावर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत 7.4 टके वाढ झाली आहे.   
विदेशी पर्यटकांना भारतात आकर्षित करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ई-व्हिसा या सेवेमुळे सुद्धा पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ई-व्हिसावरुन 1.19 लाख विदेशी पर्यटक भारतात आले. तर, याच महिन्यात गेल्यावर्षी 2016 मध्ये 0.68 लाख विदेशी पर्यटक आले होते. त्यामध्ये यंदा यामध्ये जवळपास 73.3 टक्क्यांची वाढ झाली आहे.  ई-व्हिसा सेवेचा लाभ घेत भारतात आलेल्या विदेशी पर्यटकांपैकी अमेरिकेचे पर्यटक जास्त आहेत. यामध्ये अमेरिका (12 टक्के) यूएई (7.2 टक्के), फ्रान्स (6.4 टक्के) ओमन (6.1 टक्के) आणि चीन (5.4 टक्के) या देशांमधील पर्यटक गेल्या जुलै महिन्यात ई-व्हिसावरुन भारतात आहे.

Web Title: The number of foreign tourists increased by 15 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.