विमानात महिलेकडे पाहून एनआरआयनं केला हस्तमैथुन, पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 02:44 PM2018-05-21T14:44:10+5:302018-05-21T14:44:10+5:30

दिल्लीला येणाऱ्या विमानात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला पाहून एनआरआय प्रवाशानं चक्क हस्तमैथुन केला आहे.

NRI man masturbates sitting beside Indian woman on board a flight from Istanbul, arrested | विमानात महिलेकडे पाहून एनआरआयनं केला हस्तमैथुन, पोलिसांकडून अटक

विमानात महिलेकडे पाहून एनआरआयनं केला हस्तमैथुन, पोलिसांकडून अटक

Next

नवी दिल्ली- दिल्लीला येणाऱ्या विमानात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला पाहून एनआरआय प्रवाशानं चक्क हस्तमैथुन केला आहे. या प्रकरणी त्या एनआरआयला अटक केली असून, त्याच्याकडे रशियाचा पासपोर्ट सापडला आहे. त्याच्या या अश्लाघ्य कृत्याचा महिलेने विमानाच्या क्रूमेंबर्सकडे तक्रार केली. परंतु तरीही तो त्या महिलेकडे पाहून अश्लील कृत्य करत होता. त्यानंतर महिलेनं सुरक्षा व्यवस्थेकडे दाद मागितली. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. 

रविवारी सकाळी इस्तंबूलहून दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणा-या विमानात हा प्रकार घडला. पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान हे विमान आयजीआय विमानतळावर उतरलं. त्याच वेळी 58 वर्षीय आरोपीने शेजारील जागेवर असलेल्या महिलेला पाहून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. 

विमानानं आयजीआय विमानतळावर लँडिंग केल्यानंतर महिलेने विमानतळ सुरक्षा व्यवस्थेकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या विकृत एनआरआयला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं. महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: NRI man masturbates sitting beside Indian woman on board a flight from Istanbul, arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.