आता 1299 रुपयांत करा विमान प्रवास, फक्त तीन दिवसांसाठी ऑफर मर्यादित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 12:59 PM2018-06-05T12:59:03+5:302018-06-05T12:59:03+5:30

पावसाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला विमानानं कुठे फिरायला जायचं असल्यास गो एअर या विमान कंपनीनं तुमच्यासाठी अनोखी ऑफर आणली आहे.

Now make an air travel by Rs 1299, limited the offer for just three days | आता 1299 रुपयांत करा विमान प्रवास, फक्त तीन दिवसांसाठी ऑफर मर्यादित

आता 1299 रुपयांत करा विमान प्रवास, फक्त तीन दिवसांसाठी ऑफर मर्यादित

Next

नवी दिल्ली- पावसाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला विमानानं कुठे फिरायला जायचं असल्यास गोएअर या विमान कंपनीनं तुमच्यासाठी अनोखी ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला 1299 रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे. परंतु ही ऑफर फक्त दिवसांसाठी मर्यादित आहे.

सोमवारी (4 जून) रात्री 12 वाजता ही ऑफर सुरू झाली असून, बुधवारी रात्री 12नंतर ती संपणार आहे. या ऑफरअंतर्गत आता तिकीट बुक केल्यास तुम्हाला 24 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत विमान प्रवास करता येणार आहे. मात्र ऑफरअंतर्गत वेगवेगळ्या अंतरासाठी तिकिटावर वेगवेगळं शुल्क आकारलं जाणार असून, विमान आणि त्याची वेळही वेगळी असणार आहेत.

गोएअर कंपनीच्या विमानांच्या आठवड्यातून 23 शहरांत 1,544 जास्त फे-या होतात. परंतु एकदा तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला रिफंड मिळणार नाही. जुलैमधल्या तीन महिन्यांत प्रवासी विमानानं फार कमी प्रवास करतात. त्यामुळेच गो एअरनं ही ऑफर आणल्याची चर्चा आहे. कंपनीच्या माहितीनुसार, 1299 रुपयांच्या तिकिटात सर्व प्रकारचं शुल्क समाविष्ट आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला अहमदाबाद, बागडोगरा, भुवनेश्वर, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, कोच्ची, कोलकाता, लेह, लखनऊ, मुंबई, नागपूर, पटना, पोर्ट ब्लेयर, पुणे, रांची, श्रीनगर आणि हैदराबाद या शहरांत विमान प्रवास करता येणार आहे.  

Web Title: Now make an air travel by Rs 1299, limited the offer for just three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.