धक्कादायक! नोटाबंदीत पेट्रोल पंपावर वापरलेल्या जुन्या नोटांची आकडेवारीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 05:54 AM2019-03-11T05:54:51+5:302019-03-11T06:51:20+5:30

आरबीआयचे स्पष्टीकरण; आरटीआयअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर

Not only old notes used for Nomadic Petrol Pumps! | धक्कादायक! नोटाबंदीत पेट्रोल पंपावर वापरलेल्या जुन्या नोटांची आकडेवारीच नाही!

धक्कादायक! नोटाबंदीत पेट्रोल पंपावर वापरलेल्या जुन्या नोटांची आकडेवारीच नाही!

Next

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात पेट्रोल पंप, रेल्वे तिकिट आणि वीज, पाणी आदींच्या बिलांचे पेमेंट करण्यासाठी लोकांकडून देण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटांची आकडेवारी नाही, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.

आरबीआयने माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, लोकांना सूट म्हणून सरकारने २३ सेवांसाठी बिलांचे पेमेंट करण्यासाठी जुन्या नोटा वापरण्यास सूट दिली होती. या सेवांमध्ये सरकारी हॉस्पिटल, रेल्वे, सार्वजनिक परिवहन, विमानतळावरील तिकीट, दुध केंद्र, स्मशानभूमी, पेट्रोल पंप, मेट्रो तिकीट, डॉक्टरच्या चिठ्ठीवर सरकारी आणि खासगी फार्मसीतून औषधी खरेदी करणे, एलपीजी गॅस सिलिंडर, रेल्वेतील खाद्यपदार्थ, वीज व पाण्याचे बिल, एएसआय स्मारकांचे प्रवेश तिकीट आणि टोल नाक्यावरील शुल्क आदींचा यात समावेश होता.

सरकारने नोटाबंदीनंतर या सेवांसाठी केवळ ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकार करण्यास परवानगी दिली होती. ही परवानगी १५ डिसेंबर २०१६ पर्यंत होती. सरकारने २ डिसेंबर २०१६ रोजी पेट्रोल पंप आणि विमानतळावर तिकीट खरेदी करण्यासाठी जुन्या नोटा वापरण्यावरही प्रतिबंध आणले होते. आरबीआयने म्हटले की, बिलांपोटी जी रक्कम भरण्यात आली त्याची माहिती उपलब्ध नाही. आरबीआयने मागीलवर्षी आॅगस्टमध्ये सांगितले होते की, ५०० आणि १००० रुपयांच्या ९९.३ टक्के नोटा बँकींग प्रणालीत परत आल्या आहेत. नोटाबंदीच्या वेळी ५०० आणि १००० रुपयांच्या १५.४१ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. यातील १५.३१ लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकात परत आल्या. बदलण्यात आलेल्या जुन्या नोटांची संख्या आणि मूल्य याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने २८ नोव्हेंबर २०१६ रोजी दिलेल्या निवेदनाचा हवाला दिला आहे.

किती कोटी रक्कम जमा झाली?
१० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत बँकांमध्ये ८,४४,९८२ कोटी रुपयांच्या चलनातून बाद केलेल्या नोटा जमा करण्यात आल्या आहेत किंवा बदलण्यात आल्या आहेत. यातील ३३,९४८ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यात आल्या होत्या आणि ८,११,०३३ कोटी रुपये जमा करण्यात आले.

Web Title: Not only old notes used for Nomadic Petrol Pumps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.