प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 00:05 IST2017-11-02T23:59:49+5:302017-11-03T00:05:56+5:30
नवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.

प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं ही टिपण्णी केली आहे.
प्रत्येक नको असलेल्या शारीरिक स्पर्शाला कदापि लैंगिक छळ असे संबोधता येणार नाही. परंतु जर हा स्पर्श वाईट भावनेच्या कृतीतून केलेला असल्यास त्याला लैंगिक छळ म्हणता येईल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मात्र प्रत्येक स्पर्श सरसकट लैंगिक छळ आहे, असं ठरवता येणार नसल्याचंही न्यायालयानं सांगितलं आहे.
न्यायमूर्ती बखरू यांच्यासमोर ही सुनावणी झाली, सुनावणीदरम्यान ते म्हणाले, एखाद्या वेळेस अनवधानाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला गेल्यास तो स्पर्श लैंगिक कृतींना आमंत्रण देणारा नसल्यास त्याला लैंगिक छळ म्हणता येणार नाही. सीआरआरआयच्या एका वैज्ञानिक महिलेने लैंगिक शोषणाशी संबंधित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी देताना न्यायमूर्ती बखरू यांनी हे महत्त्वपूर्ण मत मांडले आहे.
2005मध्ये आरोपी असलेला वैज्ञानिक अचानकपणे प्रयोगशाळेत प्रवेशकर्ता झाला आणि त्यानं तक्रारदार महिलेच्या हातातून नमुने हिसकावून घेतले. तसेच त्यानंतर तिला प्रयोगशाळेच्या बाहेर हकलवले, असं याचिकाकर्त्या महिलेनं म्हणणं मांडलं आहे.