गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्याचदिवशी निघाले हार्दिक पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 04:54 PM2017-10-25T16:54:13+5:302017-10-25T17:01:21+5:30

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील विसानगर येथील स्थानिक न्यायालयाने आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल, लालजी पटेल आणि अन्य पाटीदार नेत्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

Non-bailable warrant against Hardik Patel on the same day that Gujarat dates were announced | गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्याचदिवशी निघाले हार्दिक पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट

गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्याचदिवशी निघाले हार्दिक पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट

Next
ठळक मुद्दे निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या त्याचदिवशी हे वॉरंट निघाले आहे. गुजरातमधील राजकीय वातावरण तापले असून  गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. 

मेहसाणा - गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील विसानगर येथील स्थानिक न्यायालयाने आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल, लालजी पटेल आणि अन्य पाटीदार नेत्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. भाजपा आमदार ऋषीकेष पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले आहे. जुलै 2015 साली विसानगरमध्ये  पाटीदार अनामत समितीचा मोर्चा निघाला होता. त्यावेळी ऋषीकेष पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. 2016 साली याच ऋषीकेष पटेल यांच्या गाडीवर विसानगर येथील आयटीआय सर्कलजवळ दगडफेक करण्यात आली होती. 

 विसानगर हे पाटीदार अनामत आंदोलन समितीचे एक प्रमुख केंद्र होते. निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या त्याचदिवशी हे वॉरंट निघाले आहे. दरम्यान गुजरातमधील राजकीय वातावरण तापले असून  गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. 

दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे आले होते. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ‘महाचोर’ भाजपाला सत्तेवरून दूर करण्याचे आव्हान स्वीकारत असेल, तर ‘चोर’ काँग्रेसला मी पाठिंबा द्यायला तयार आहे, असे पाटीदार अनामत आंदोलनचे नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. 

उत्तर गुजरातेतील मंडल येथे सोमवारी रात्री मेळाव्यात ते बोलत होते. पटेल म्हणाले, काँग्रेस हा चोर असला, तरी भाजपा महाचोर आहे. महाचोराला पराभूत करायचे असेल, तर चोराला पाठिंबा आम्हाला द्यावा लागेल व तो आम्ही देऊ, परंतु त्यासाठी संयम दाखवावा लागेल. सध्या तरी आम्ही कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पटेल यांनी, मी सोमवारी उम्मेद हॉटेलमध्ये होतो, परंतु राहुल गांधींना मी भेटलो, अशा बातम्या आल्या असल्या, तरी त्या चुकीच्या आहेत. काँग्रेसकडून निमंत्रण आल्यावर मी रविवारी रात्री ३ वाजता हॉटेलवर पोहोचलो. मी गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत यांना भेटलो. तसाही उशीर झाला होता, त्यामुळे मी हॉटेलमध्येच थांबायचे ठरवले, परंतु त्यांनी (भाजपा) सीसीटीव्ही कॅमेºयाच्या क्लिप्ज मिळविल्या व पसरविल्या. कारण येथील सगळ्याच गोष्टी या त्यांच्या मालमत्ता आहेत, असे हार्दिक पटेल म्हणाले.

Web Title: Non-bailable warrant against Hardik Patel on the same day that Gujarat dates were announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.