गोमांसनं भरलेलं वाहन जप्त, दोन जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 04:23 PM2019-01-29T16:23:48+5:302019-01-29T16:28:11+5:30

पोलिसांनी छापेमारी करत 10 क्विंटल गोमांस जप्त केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दादरी पोलिसांनी दोन जणांना अटकदेखील केली आहे. 

Noida : 2 arrested for cow slaughter, 10 Quintals of beef seized | गोमांसनं भरलेलं वाहन जप्त, दोन जणांना अटक 

गोमांसनं भरलेलं वाहन जप्त, दोन जणांना अटक 

Next
ठळक मुद्दे10 क्विंटल गोमांस जप्तदोन जणांना अटक आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नोएडा - पोलिसांनी छापेमारी करत 10 क्विंटल गोमांस जप्त केल्याची घटना समोर आली आहे. दादरी क्षेत्रातील बैरंगपूर गावातील पेट्रोल पंप जवळील ही घटना आहे. याप्रकरणी दादरी पोलिसांनी दोन जणांना अटकदेखील केली आहे. 

दादरी पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक राम सेन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (28 जानेवारी) रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बैरंगपूर गावाजवळील मोहसिन आणि कदीर नावाच्या व्यक्तींना अटक केली आहे. या दोघांकडे असलेल्या वाहनामधील 10 क्विंटल गोमांस जप्त करण्यात आले आहे. 

(गोवंश मांसाची विदेशात तस्करी)

याप्रकरणी खोडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या कुलदीप यांनी दादरी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Web Title: Noida : 2 arrested for cow slaughter, 10 Quintals of beef seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.