नोटाबंदी म्हणजे सरकारी त्सुनामी - पी. चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 05:13 AM2017-10-29T05:13:38+5:302017-10-29T05:14:56+5:30

नोटाबंदीचा अविचारी निर्णय आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यामुळे देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरली आहे

Nodbing means government tsunami - p. Chidambaram | नोटाबंदी म्हणजे सरकारी त्सुनामी - पी. चिदंबरम

नोटाबंदी म्हणजे सरकारी त्सुनामी - पी. चिदंबरम

Next

मुंबई : नोटाबंदीचा अविचारी निर्णय आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यामुळे देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरली आहे. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय ही सर्वात मोठी ‘मानवी चूक’ ठरली आहे. त्सुनामी, मुंबईतील पूर अशा नैसर्गिक संकटापेक्षा जास्त नुकसान नोटाबंदीच्या निर्णयामुळे झाले
आहे, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी केली.
विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने ‘नोटाबंदी आणि जीएसटी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात चिदंबरम बोलत होते. याप्रसंगी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते गुरुदास कामत, संजय निरुपम, नसीम खान, जनार्दन चांदूरकर आदी नेते उपस्थित होते. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना चिदंबरम म्हणाले की, नोटाबंदी एक प्रकारचा आर्थिक घोटाळा आहे. काळ्या पैसेवाल्यांना मदत करण्यासाठी, काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली. या नोटाबंदीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था थोडीफार सावरत असतानाच त्यावर जीएसटीचा घाव घालण्यात आला. जीएसटी ही एक चांगली करप्रणाली आहे. मात्र, केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने तिची अंमलबजावणी केल्याचे चिदंबरम म्हणाले. मोदी सरकारने जीएसटीला बदनाम केल्याचेही ते म्हणाले.
आर्थिक आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. सामान्य नागरिकांच्या हालअपेष्टांकडे सरकारचे लक्ष नाही. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे झालेले नुकसान रोखण्याची अजूनही संधी आहे. परंतु आपला निर्णय चुकल्याचे या सरकारला मान्यच करायचे नाही. त्यामुळे घसरलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आता लोकांनीच योग्य व्यक्तींच्या हातात सत्ता सोपविण्याची गरज असल्याचे चिदंबरम म्हणाले.
काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास जीएसटी करप्रणालीत सुधारणा
केली जाईल. १८ टक्क्यांहून अधिक जीएसटी आकारला जाणार
नाही. छोट्या आणि मध्यम
उद्योगांना सहा महिन्यांतून एकदाच रिटर्न भरावा लागेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

शेतकी उत्पन्न, नोकºया, घटते बालमृत्यूदर आणि निर्यात ही चांगल्या अर्थव्यवस्थेची लक्षणे आहेत. सध्या देशात या चारही घटकांची स्थिती चांगली नाही. देश सध्या रोजगारशून्य विकास अनुभवत असून असा विकास टाइमबॉम्बसारखा असतो. नवीन रोजगारही तयार झाला नाही. उलट नोटाबंदीमुळे लाखो लोकांचा रोजगार बुडाल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीला धाडसी निर्णय म्हणत असले तरी हा
निर्णय शेतकºयांच्या आत्महत्यांप्रमाणे आहे. आत्महत्येचा निर्णयही धाडसी असला तरी चुकीचा असतो, असेही चिदंबरम म्हणाले.

Web Title: Nodbing means government tsunami - p. Chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.