पुढील वर्षापासून नवे इंजिनिअरिंग कॉलेज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 06:18 AM2019-01-20T06:18:30+5:302019-01-20T06:18:39+5:30

२०२०-२१ या आगामी शैक्षणिक वर्षापासून देशात कोणतेही नवे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी न देण्याचे अ. भा. तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ठरविले आहे.

No new engineering college since next year | पुढील वर्षापासून नवे इंजिनिअरिंग कॉलेज नाही

पुढील वर्षापासून नवे इंजिनिअरिंग कॉलेज नाही

Next

नवी दिल्ली : २०२०-२१ या आगामी शैक्षणिक वर्षापासून देशात कोणतेही नवे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी न देण्याचे अ. भा. तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ठरविले आहे. मात्र, महाविद्यालयांतील सोयी-सुविधांचा विचार करून तेथे अतिरिक्त जागा मंजूर करण्यावर परिषद निर्णय घेईल.
हैदराबाद आयआयटीचे अध्यक्ष पीव्हीआर मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीनुसार परिषदेने हा निर्णय घेतला. परिषदेने २०२०-२१ पासून परवानगी देणे बंद करावे. त्यानंतर दर दोन वर्षांनी किती महाविद्यालयांची गरज आहे, याचा आढावा घ्यावा, असे समितीने सुचविले होते. देशात एकूण ३,२९१ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत व त्यांची प्रवेशक्षमता १५.५ लाख आहे. मात्र यापैकी ५१ टक्के जागा रिकाम्या राहिल्या होत्या.

Web Title: No new engineering college since next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.