'अच्छे दिन' आले नाहीत, आता देशाला 'सच्चे दिन' हवेत; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 09:14 PM2018-08-15T21:14:26+5:302018-08-15T21:24:55+5:30

मोदींच्या भाषणावर काँग्रेसची जोरदार टीका

No hope for Achhe Din people waiting for Sachhe Din congress slams pm modi | 'अच्छे दिन' आले नाहीत, आता देशाला 'सच्चे दिन' हवेत; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

'अच्छे दिन' आले नाहीत, आता देशाला 'सच्चे दिन' हवेत; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेलं भाषण अतिशय उथळ होतं. त्यात काहीही नवं नव्हतं, अशा शब्दांमध्ये काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या कार्यकाळात अच्छे दिन आले नाहीत, आता जनतेला सच्चे दिन हवे आहेत, असा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरील भाषण अतिशय उथळ होतं. त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नव्हतं, असं सुरजेवाला पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. मोदींच्या भ्रष्टाचाराबद्दलच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'राफेल विमान खरेदी प्रकरण असो वा व्यापम घोटाळा किंवा छत्तीसगडमधील पीएएस घोटाळा, मोदी एकाही विषयावर बोलले नाहीत,' असं सुरजेवाला 'यांनी म्हटलं. डोकलाममधील चीनच्या घुसखोरीबद्दलदेखील मोदी मूग गिळून गप्प बसतात. देशामध्ये द्वेष पसरवणाऱ्या घटना घडत असतानाही मोदी गप्पच राहतात,' अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींवर तोफ डागली. 




पंतप्रधानांनी त्यांच्या लाल किल्ल्यावरील शेवटच्या भाषणात तरी खरं बोलायला हवं होतं, असा चिमटादेखील सुरजेवाला यांनी काढला. 'मोदींच्या संपूर्ण भाषणात काहीच तथ्य नव्हतं. लाल किल्ल्यावरील अखेरच्या भाषणात तरी मोदींनी खरं बोलायला हवं होतं. मोदी मन की बात करु शकत नाहीत. त्यांनी किमान काम की बात करायला हवी होती,' असं सुरजेवाला यांनी म्हटलं. देशवासीयांनी अच्छे दिनची वाट पाहणं केव्हाच सोडून दिलं आहे. आता जनतेला सच्चे दिन पाहायचे आहेत, असा टोला त्यांनी लगावला. 



 

Web Title: No hope for Achhe Din people waiting for Sachhe Din congress slams pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.