'नो बेगिंग प्लीज'; उपराष्ट्रपती नायडूंची राज्यसभा सदस्यांना पुन्हा सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 05:43 PM2017-12-29T17:43:00+5:302017-12-29T17:48:27+5:30

''नो बेगिंग प्लीज'' अशा शब्दांमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदस्यांना पुन्हा एकदा वसाहतवादातून आलेले संस्कार विसरा असा संदेश दिला.

'No begging please': Rajya Sabha chairman Venkaiah Naidu reminds ministers | 'नो बेगिंग प्लीज'; उपराष्ट्रपती नायडूंची राज्यसभा सदस्यांना पुन्हा सूचना

'नो बेगिंग प्लीज'; उपराष्ट्रपती नायडूंची राज्यसभा सदस्यांना पुन्हा सूचना

googlenewsNext
ठळक मुद्देमी याचना करतो वगैरे शब्द हे वसाहतवादातून आलेले आहेत असे सांगत या मानसिकतेतून बाहेर या असा संदेश नायडू यांनी दिला होता. त्याचप्रमाणे ही माझी केवळ सूचना आहे असेही ते हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणाले होते.

नवी दिल्ली- ''नो बेगिंग प्लीज'' अशा शब्दांमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदस्यांना पुन्हा एकदा वसाहतवादातून आलेले संस्कार विसरा असा संदेश दिला. दैनंदिन कार्यसुचीमध्ये सदस्यांच्या नावासमोर उल्लेख केलेले कागदपत्र सभापटलावर ठेवताना "आय बेग टू ले पेपर्स लिस्टेड अगेन्स्ट माय नेम" असं म्हणण्याची गरज नाही असे नायडू यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही सांगितले होते. बेग (याचना करतो) असा शब्दप्रयोग वापरण्याऐवजी "आय राइज टू प्रेझेंट द पेपर्स लिस्टेड अगेन्स्ट माय नेम" असे म्हणावे अशी सूचना त्यांनी आज पुन्हा एकदा केली.

मी याचना करतो वगैरे शब्द हे वसाहतवादातून आलेले आहेत असे सांगत या मानसिकतेतून बाहेर या असा संदेश नायडू यांनी दिला होता. त्याचप्रमाणे ही माझी केवळ सूचना आहे असेही ते हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणाले होते. आज केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री पी.पी. चौधरी यांनी "बेग" असा शब्द वापरल्यावर नायडू यांनी आपल्या सल्ल्याची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. चौधरी यांना " नो बेगिंग प्लीज" असे नायडू यांनी सूचित केले. 

आय बेग सारखे शब्द टाळण्याची सूचना केली होती तेव्हा कदाचित चौधरी सभागृहात उपस्थित नसावेत असे सांगत, ''फक्त मी पेपर सादर करत आहे असे म्हणावे, "याचना करतो" हा शब्दप्रयोग टाळता आला तर चांगले होईल'' असे उपराष्ट्रपती नायडू यांनी चौधरी यांना सूचित केले. 15 डिसेंबरपासून "बेग" हा शब्द कोणत्याही मंत्री अगर राज्यसभा सदस्याने वापरला नव्हता.

Web Title: 'No begging please': Rajya Sabha chairman Venkaiah Naidu reminds ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.