नितीश कुमारांची 'घरवापसी', भाजपाच्या पाठिंब्यावर करणार सरकार स्थापनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 09:54 PM2017-07-26T21:54:02+5:302017-07-26T23:54:45+5:30

नितीश कुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपाने नितीश कुमार यांना बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे.

Nitish Kumar BJP alliance | नितीश कुमारांची 'घरवापसी', भाजपाच्या पाठिंब्यावर करणार सरकार स्थापनेचा दावा

नितीश कुमारांची 'घरवापसी', भाजपाच्या पाठिंब्यावर करणार सरकार स्थापनेचा दावा

Next
ठळक मुद्देमहागठबंधन तुटल्याने नितीश कुमार यांना जर पुन्हा सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना भाजपाची मदत घेण्याशिवाय आता पर्याय नाहीये.   243 जागा असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 जागा मिळवणं गरजेचं आहे. नितीशकुमार भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत गेल्यास जदयूच्या 71 आणि भाजपाच्या 53 मिळून दोघांच्या 124  जागा होतील. 

पाटणा, दि. 26 - नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.  नितीश कुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपाने त्यांना बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. नितीश कुमार सरकार स्थापनेसाठी दावा करणार असल्याची माहिती बिहार भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी दिली आहे. नितीश कुमार यांच्यासोबत भाजपाचे 14 आमदारदेखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपाचे बिहारमधील वरिष्ठ नेते सुशील मोदी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याआधीही त्यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.  त्यामुळे काही वर्षांपूर्वी एनडीएला सोडचिट्ठी देणा-या नितीश कुमारांची पुन्हा घरवापसी झाल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री निवासात भाजपा आणि जदयूच्या आमदारांची बैठक झाल्याचं बोललं जात आहे. त्यामध्ये सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार नितीश कुमार उद्या  मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. उद्या संध्याकाळी 5 वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितीश कुमारांच्या राजीनाम्यासोबतच भाजपाला रोखण्यासाठी एकत्र आलेले जेडीयू-आरजेडी-काँग्रेस यांच्या महागठबंधनाचा अंत झाला.  आता नवं सरकार स्थापन करण्यावर विचार-मंथन सुरू असून यामध्ये भाजपाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण आता बिहारमध्ये भाजपाच्या मदतीशिवाय सरकार बनवणं अशक्य आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना भाजपचा पाठिंबा मिळेल, असा अंदाज लावला जात होता. अखेर तो अंदाज आता खरा ठरला आहे.

बिहार विधानसभेत असं बदलू शकतं गणित...
महागठबंधन तुटल्याने नितीश कुमार यांना जर पुन्हा सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना भाजपाची मदत घेण्याशिवाय आता पर्याय नाहीये.    243 जागा असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 जागा मिळवणं गरजेचं आहे. नितीशकुमार भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत गेल्यास जदयूच्या 71 आणि भाजपाच्या 53 मिळून दोघांच्या 124  जागा होतील. 

बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य)
राष्ट्रीय जनता दल (राजद) – 80
जनता दल यूनायटेड (जदयू) – 71
काँग्रेस – 27
भाजप (विरोधी पक्ष) – 53
सीपीआय – 3
लोक जनशक्ती पार्टी – 2
राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
अपक्ष – 4

 

 

Web Title: Nitish Kumar BJP alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.