"जलमार्ग केला नसता तर प्रियंका गांधींची गंगायात्रा पूर्ण झाली असती का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 02:56 PM2019-03-25T14:56:59+5:302019-03-25T14:58:11+5:30

प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का ? असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केलाय.

Nitin Gadkari Says If We Not Made Allahabad Varanasi Waterway, How Could Priyanaka Gandhi Travelled | "जलमार्ग केला नसता तर प्रियंका गांधींची गंगायात्रा पूर्ण झाली असती का?"

"जलमार्ग केला नसता तर प्रियंका गांधींची गंगायात्रा पूर्ण झाली असती का?"

Next

नागपूर - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी गंगायात्रा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचं लक्ष्य केलं होतं. मात्र प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का ? असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केलाय. 

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, गंगायात्रेच्या दरम्यान प्रियंका गांधी यांनी गंगेचं पाणी प्यायल्या, जर गंगा नदीची स्वच्छता आम्ही केली नसती तर गंगेचे पाणी पिता आलं असतं का ? युपीए सरकारच्या काळात तुम्ही हे काम केलं नाही. ते काम आम्ही केले. मार्च 2020 पर्यंत गंगा नदी पूर्णपणे स्वच्छ झालेली असेल असा दावा नितीन गडकरी यांनी केला. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी 140 किमीच्या गंगा यात्रा पूर्ण केली होती. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघात भेट दिली.कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दौऱ्यावरुनच प्रियांका गांधी यांच्यावर गडकरींनी टीका केली. गंगेत पुन्हा डॉल्फिन मासे दिसायला लागले आहेत. तर प्रयागराजच्या काठावर सायबेरियन पक्षीही पहायला मिळाले. याशिवाय कासवांची संख्याही वाढली असल्याचा विश्वास नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी यांनी विरोधकांवरही साधला निशाणा
यंदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत. या विरोधी पक्षांचे नेत्यांचे मुख्य उद्दीष्ट आहे की, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू नये. विरोधी पक्षांवर आलेल्या संकटामुळे ते सगळे एकत्र आलेत. विरोधी पक्षांकडे कोणताच मुद्दा नाही. यांच्याकडे नेते नाहीत. भाजपा सरकारने आपली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत तसेच जगात देशाचा सन्मान वाढवला आहे. 



 

प्रियंका गांधी नौका यात्रेनंतर करणार आता रेल्वेने प्रवास 
प्रियंका गांधी नौका यात्रेनंतर आता रेल्वेनं लोकांशी संपर्क साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी असलेल्या प्रियंका गांधी 27 मार्चला दिल्ली ते फैजाबाद दरम्यान रेल्वे यात्रा करणार आहेत. ही यात्रा करताना त्या त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधतील

Web Title: Nitin Gadkari Says If We Not Made Allahabad Varanasi Waterway, How Could Priyanaka Gandhi Travelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.