पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती होती; जैशच्या दहशतवाद्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:26 AM2019-04-09T11:26:19+5:302019-04-09T11:58:50+5:30

निसार अहमद तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती होती असे त्याने म्हटले आहे. 

nisar ahmed tantray jaish commander reveals he knew about pulwama attack | पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती होती; जैशच्या दहशतवाद्याचा खुलासा

पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती होती; जैशच्या दहशतवाद्याचा खुलासा

Next
ठळक मुद्देनिसार अहमद तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती होती असे त्याने म्हटले आहे.निसार अहमद तांत्रे याची सध्या राष्ट्रीय तपास पथकाकडून (एनआयए) चौकशी करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - संयुक्त अरब अमीरातने (यूएई) दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'चादहशतवादी निसार अहमद तांत्रे याला काही दिवसांपूर्वी भारताकडे सोपवले होतं. तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती होती असे त्याने म्हटले आहे. 

निसार अहमद तांत्रे याची सध्या राष्ट्रीय तपास पथकाकडून (एनआयए) चौकशी करण्यात येत आहे. 'जैश' च्या आदेशानुसारच पुलवामाचा हल्ला झाला होता. त्याचबरोबर खान हीच ती व्यक्ती आहे की, ज्याने या हल्ल्याचे नेतृत्व करीत तो घडवून आणला होता याला तांत्रेने दुजोरा दिला आहे. तपास पथकांना आपल्या गुप्तचरांची माहिती आणि खालच्या स्तरावरील दहशतवाद्यांच्या चौकशीवरच तपास निर्भर होता. निसार अहमद तांत्रेनी चौकशीदरम्यान दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काश्मीर खोऱ्यात 'जैश' च्या कार्यकर्त्यांवर तांत्रेचा प्रभाव असल्याचे गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. खानने त्याला सोशल मीडिया अ‍ॅपच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती दिली होती. खानने म्हटले होते की, फेब्रुवारीच्या मध्यात पुलवामात तो अनेक मोठे स्फोट घडवून आणणार आहे. त्याचबरोबर खानने तांत्रेकडून या हल्ल्यासाठी नियोजन आणि तो प्रत्यक्ष घडवून आणण्यासाठी मदत मागितली असल्याची माहिती तांत्रेने चौकशी दरम्यान दिली आहे. 'जैश'चा निसार अहमद तांत्रे हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. 30 आणि 31 डिसेंबरच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले होते. तर जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 

निसार तांत्रे हा जैशच्या दक्षिण काश्मीरचा विभागीय कमांडर नूर तांत्रे यांचा भाऊ आहे. निसारला विशेष विमानाने दिल्लीत आणले गेले. त्यानंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआय) ताब्यात देण्यात आले होते. एनआयए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांनी निसारविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. याच आधारे त्याला यूएईकडून भारतात आणले गेले. नूर तांत्रे यानेच जैश-ए-मोहम्मद या संघटनेला काश्मीर खोऱ्यात जम बसवायला मदत केली असे मानले जाते. डिसेंबर 2017 मध्ये एका चकमकीत नूरला ठार करण्यात आले. 

मागच्या काही वर्षात संयुक्त अरब अमीरातीने देशात गुन्हे करुन फरार झालेले आरोपी, दहशतवादी यांना पुन्हा भारताकडे सोपवून खरोखरचे चांगले उदाहरण समोर ठेवले आहे. यूएईने आतापर्यंत ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात लाच खाण्याचा आरोप असलेला आरोपी ख्रिश्चियन मिशेल, या प्रकरणातील कथित दलाल दीपक तलवार यांच्या व्यतिरिक्त दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे समर्थक, इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल वाहिद सिद्दिबापा आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी फारूख टकलासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात दिले आहे. निसार तांत्रे याच वर्षी भारतातून यूएईला पळून गेल्याचे सांगितले जात आहे. 

लेथपोरा प्रकरणातच पुलवामा येथील अवंतीपुराचा रहिवासी असलेल्या फय्याज अहमद मॅग्रे याला फेब्रुवारीत अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्रालचा फरदीन अहमद खांडे, पुलवामाच्या द्रुबग्रामचा रहिवासी मंजूर बाबा आणि पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल शकूर यांना ठार करण्यात आले होते. शकूर हा पाकव्याप्त काश्मीरच्या रावलकोटचा रहिवासी होता. फेब्रुवारीमध्ये एनआयने अटक केलेला फय्याज हा दहशतवादी हा जैश-ए-मोहम्मदचा सक्रिय सदस्य होता. फय्याजने हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लपण्यासाठी जागा, हत्यारे आणि माहिती उपलब्ध केली होती. 


 

Web Title: nisar ahmed tantray jaish commander reveals he knew about pulwama attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.