केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 10 जणांचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे निपाह व्हायरस?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 02:58 PM2018-05-21T14:58:25+5:302018-05-21T14:58:25+5:30

देशात जीवघेणा व अत्यंत दुर्मिळ निपाह विषाणूच्या(Virus) संसर्गामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्यानं घबराट पसरली आहे.

nipah virus kerala India dead people about the disease symptoms and prevention | केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 10 जणांचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे निपाह व्हायरस?

केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 10 जणांचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे निपाह व्हायरस?

googlenewsNext

तिरुवअंनतपुरुम - देशात जीवघेणा व अत्यंत दुर्मिळ निपाह विषाणूच्या(Virus) संसर्गामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्यानं घबराट पसरली आहे. केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह विषाणू जलद गतीनं पसरत आहे. या विषाणूमुळे येथील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी 25 जणांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये निपाह विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. निपाह विषाणूचा धोका लक्षात घेता केरळ सरकारनं केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. केरळ सरकारच्या मागणीची गांभीर्यानं दखल घेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डानं नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी)चं पथक केरळमध्ये पाठवण्याचे आदेश दिलेत.  

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरत आहे. 1998 साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणूबाबतची प्रकरणं समोर आली होती. यामुळे या विषाणूला 'निपाह' असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता. 2004मध्ये बांगलादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे.  

(सावधान... निपाह विषाणू ठरतोय जीवघेणा; ही लक्षणं दिसताच त्वरित उपचार घ्या!)

- निपाह विषाणूबाबतची माहिती 
मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरणारा निपाह हा गंभीर संसर्गजन्य विषाणू आहे. यास NiPah Virus Encephalitis (Encephalitis म्हणजे मेंदूला आलेली सूज) असंही म्हटलं जातं. या संसर्ग फळ-फुलांद्वारे होतो. खजुराचे उत्पन्न घेणाऱ्या लोकांमध्ये या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती समोर आली आहे. 2004 साली या विषाणूमुळे बांगलादेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते.  

- निपाह विषाणू संसर्गाची लक्षणं
रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.
मेंदूमध्ये जळजळ होते.  
मेंदूला सूजदेखील येण्याची शक्यता असते. 
ताप, डोकेदुखी, चक्कर येणे.
डॉक्टरांनुसार काही प्रकरणांमध्ये योग्य वेळेत निदान किंवा उपचार न झाल्यास रुग्ण कोमामध्ये जाण्याचीही शक्यता असते. 

- कशी घ्याल स्वतःची काळजी?
निपाह विषाणूवर अद्यापपर्यंत प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची लागण होऊ नये यासाठी फळं विशेषतः खजूर खाणं टाळले पाहिजे. जमिनीवर पडलेली फळं खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. आजारी डुक्कर तसंच अन्य प्राण्यांपासून दूर राहिले पाहिजे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीलाही याचा संसर्ग होतो. त्यामुळे विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. 

Web Title: nipah virus kerala India dead people about the disease symptoms and prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.