सुरतमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर तब्बल 8 दिवस बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 08:33 AM2018-04-15T08:33:54+5:302018-04-15T08:34:25+5:30

8 वर्षाच्या मुलीच्या अंगावर 87 जखमांच्या खुणा आढळून आल्याचं समजतं आहे.

Nine-year-old girl raped in Gujarat's Surat; autopsy reveals 86 injury marks, tortured for days | सुरतमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर तब्बल 8 दिवस बलात्कार

सुरतमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर तब्बल 8 दिवस बलात्कार

Next

गुजरात -  देशात बलात्काराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. कठुआ, उन्नावनंतर आता गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर तब्बल 8 दिवस बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कारानंतर आरोपीकडून मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.  

सूरतमध्येही एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्येची घटना घडली.  पीडित मुलीवर तब्बल 8 दिवस अत्याचार करुन, नराधमानी तिची निर्घृण हत्या केली आहे. सूरतमधल्या पांडेसरा भागात एका क्रिकेट ग्राऊंडजवळ या चिमुकलीचा मृतदेह आढळला होता. या घटनेतल्या आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठत मुलीला प्रचंड यातना दिल्याचं तिच्या मृतदेहावरुन लक्षात येत आहे. कारण या 8 वर्षाच्या मुलीच्या अंगावर 87 जखमांच्या खुणा आढळून आल्याचं समजतं आहे. पण अजूनही या मुलीची ओळख मात्र पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Nine-year-old girl raped in Gujarat's Surat; autopsy reveals 86 injury marks, tortured for days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.