नवी दिल्ली : वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ, झकीर नाईक यांच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नव्याने समन्स काढले असून, जाबजबाबांसाठी येत्या ३० मार्च रोजी दिल्ल्लीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये नोंदविलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात या आधी काढलेल्या समन्सनुसार हजर न राहिल्याने, ‘एनआयए’ने हे नवे समन्स काढले आहे. हे समन्स नाईक यांच्या मुंबईतील पत्त्यावर पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नाईक हे ‘इस्लामी रीसर्च फाउंडेशन’चे संस्थापक असून, या संस्थेवरील बंदी आदेश काही दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने कायम केला आहे.