नवविवाहित दाम्पत्याचा हनिमून शूट करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 05:08 PM2018-06-03T17:08:33+5:302018-06-03T17:08:33+5:30

एका आंबट शौकिनानं नवविवाहित दाम्पत्य प्रणय क्रीडेत रममाण असतानाचे दृश्य कॅमे-यात कैद केले आहेत.

Newly-married couple's hanger shooter | नवविवाहित दाम्पत्याचा हनिमून शूट करणारा अटकेत

नवविवाहित दाम्पत्याचा हनिमून शूट करणारा अटकेत

Next

बेळगाव : एका आंबट शौकिनानं नवविवाहित दाम्पत्य प्रणय क्रीडेत रममाण असतानाचे दृश्य कॅमे-यात कैद केले आहेत. बेळगावजवळील पिरनवाडी येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्या लिंगपिसाटाला बेड्याही ठोकल्या आहेत. 

पिरनवाडी येथे नुकतंच लग्न झालेलं एक दाम्पत्य भाड्याने घर घेऊन राहत होते. त्याच वेळी शेजारील राहणा-या तरुणानं रात्रीच्या वेळी त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. तसेच नवविवाहित दाम्पत्याच्या घरातल्या खिडकीतून रात्रीच्या दरम्यान तो चोरून चित्रीकरण करू लागला. जवळपास पाच दिवस तो सातत्यानं रात्रीच्या वेळी त्या नवविवाहित दाम्पत्याच्या हालचाली कॅमे-यात टिपत होता.

परंतु ज्यावेळी सहाव्या दिवशी तो मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यास गेला, त्यावेळी त्या दाम्पत्यानं त्याला रंगेहाथ पकडलं. लागलीच दाम्पत्यानं ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये या तरुणाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत सुनील वाडकर या आरोपीला अटक केली. 

Web Title: Newly-married couple's hanger shooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.