व्हॉट्सअ‍ॅपवरून पाच वेळाच फॉरवर्डची मिळणार मुभा, अफवा रोखण्यासाठी कंपनीने भारतात लागू केला नवीन नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 04:48 AM2018-08-10T04:48:13+5:302018-08-10T04:48:42+5:30

भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून आता कोणताही संदेश फक्त पाच जणांनाच फॉरवर्ड करता येईल.

New rules to be implemented in India for prevention of rumors | व्हॉट्सअ‍ॅपवरून पाच वेळाच फॉरवर्डची मिळणार मुभा, अफवा रोखण्यासाठी कंपनीने भारतात लागू केला नवीन नियम

व्हॉट्सअ‍ॅपवरून पाच वेळाच फॉरवर्डची मिळणार मुभा, अफवा रोखण्यासाठी कंपनीने भारतात लागू केला नवीन नियम

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून आता कोणताही संदेश फक्त पाच जणांनाच फॉरवर्ड करता येईल. त्याची अंमलबजावणी या आठवड्यापासून सुरु झाली आहे. अफवांचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्याबद्दल केंद्र सरकारने कान उपटल्यानंतर व्हॉट्सअपने हे पाऊल उचलले आहे. देशातील २० कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. त्या सर्वांनाच या नव्या नियमाचा फटका बसणार आहे.
या नव्या नियमाबद्दल व्हॉट्सअ‍ॅपने गेल्याच महिन्यात सुतोवाच केले होते. व्हॉट्सअ‍ॅप कसे वापरावे, अफवा व खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी काय करता येईल याची माहिती देणारा एक नवीन व्हिडिओ या कंपनीने तयार केला. तो या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
एखादा संदेश आपण दुसºयांना पाठवितो त्यावेळी काही दक्षता घेणे आवश्यक असते. मूळ संदेश कोणी लिहिला हे माहीत नसल्यास त्यात नेमके काय म्हटले आहे याची खातरजमा करुन घ्यावी. त्यातील माहिती खरी न वाटल्यास तो संदेश इतरांना पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
>इतर देशांत एक संदेश
वीस वेळा पुढे पाठविण्याची मुभा
भारतामध्ये वापरकर्ते जेवढ्या प्रमाणात छायाचित्रे, संदेश, व्हिडिओ इतरांना पाठवितात तेवढा उत्साह अन्य देशांत आढळून येत नाही. भारताव्यतिरिक्त अन्य देशांत तेथील वापरकर्त्यांना एक संदेश दुसºयांना वीस वेळा पाठविण्याची मुभा व्हॉट्सअपने दिली आहे.राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम ही समाजमाध्यमे काही काळ बंद ठेवावीत, असे आदेश दूरसंचार खात्याने या दूरध्वनी कंपन्यांना दिल्याचे वृत्त होते. मात्र यासंदर्भात व्हॉट्सअपने म्हटले की, अफवा व खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन बंद करणे हा उपाय नाही. त्यापेक्षा वेगळ््या व प्रभावी उपाययोजना सरकारने कराव्यात.

Web Title: New rules to be implemented in India for prevention of rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.