राज्यसभेत एनडीए बहुमतासमीप, आता केवळ 6 जागांची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 09:55 AM2019-07-01T09:55:51+5:302019-07-01T09:57:31+5:30

लोकसभेमध्ये साडेतीनशेहून अधिक खासदारांचे भक्कम पाठबळ मिळवल्यानंतर आता राज्यसभेमध्येही एनडीए बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

NDA near Majority In the Rajya Sabha, now needs only 6 seats | राज्यसभेत एनडीए बहुमतासमीप, आता केवळ 6 जागांची गरज 

राज्यसभेत एनडीए बहुमतासमीप, आता केवळ 6 जागांची गरज 

Next

नवी दिल्ली - लोकसभेमध्ये साडेतीनशेहून अधिक खासदारांचे भक्कम पाठबळ मिळवल्यानंतर आता राज्यसभेमध्येही एनडीए बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तेलगू देसमच्या चार आणि आयएनएलडीच्या एका खासदाराने भाजपात प्रवेश केल्याने भाजपा आणि एनडीएचे संख्याबळ वाढले आहेत. आता 5 जुलै रोजी अजून चार खासदार एनडीएमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे, असे झाल्यास राज्यसभेमध्ये एनडीए बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचेल. राज्यसभेतील संख्याबळ वाढल्याने अनेक महत्त्वाकांक्षी विधेयके पारित करून घेणे सत्ताधारी भाजपाला शक्य होणार आहे. 

रविवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत 235 सदस्य असलेल्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये एनडीएचे 111 सदस्य आहेत. सध्या राज्यसभेच्या 10 जागा असून, त्यापैकी एनडीएचे चार खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीएच्या सदस्यांचा आकडा 115 पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे 241 सदस्यांच्या राज्यसभेत एनडीएचे 115 सदस्य असतील, अशा परिस्थितीत एनडीए बहुमतापासून केवळ 6 जागांनी मागे राहील. तर राज्यसभेत संपूर्ण 245 सदस्यांची नियुक्ती झाल्यास एनडीएला बहुमतासाठी 123 सदस्यांची गजर पडेल. 


 मात्र अनेक प्रादेशिक पक्षांनी भाजपा आणि एनडीएशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारल्याने राज्यसभेमध्ये विधेयके पारित करून घेताना एनडीएला फारशी समस्या येणार नाही. सध्या टीआरएस, बीजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस असे पक्ष एनडीएला राज्यसभेमध्ये पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे विधेयके संमत करून घेताना संख्याबळाची फार अडचण येणार नाही, असा विश्वास भाजपाच्या राज्यसभेमधील फ्लोअर मॅनेजर्सनी व्यक्त केला आहे. 

 2014 ते 2019 या काळात केंद्र सरकारची अनेक विधेयके विरोधकांनी संख्याबळाच्या जोरावर रोखली होती. तसेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणालाही संशोधनासाठी पाठवण्याची वेळ आली होती. मात्र आता लोकसभेपाठोपाठ राज्यसभेमध्येही विरोधकांचे संख्याबळ घटल्याने विरोधकांकडून विधेयकांना आडकाठी होण्याची शक्यता फार कमी आहे.  

Web Title: NDA near Majority In the Rajya Sabha, now needs only 6 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.