राष्ट्रीय सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देणार; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 02:33 AM2019-06-21T02:33:44+5:302019-06-21T02:34:06+5:30

घुसखोरांमुळे देशाला धोका; काश्मीरमध्ये शांततेचे प्रयत्न- राष्ट्रपती

National Security will give highest priority; President's address, Ramnath Kovind | राष्ट्रीय सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देणार; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण

राष्ट्रीय सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देणार; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण

Next

नवी दिल्ली : भारताचा २०१४ पासून सुरू झालेला विकासाचा प्रवास यापुढेही सुरू राहण्यासाठी मतदारांनी लोकसभा निवडणुकांत कौल दिला, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणात सांगितले. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी व लोकसभाध्यक्षांची निवड यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी गुरुवारी अभिभाषण केले. त्यांच्या भाषणातील हे प्रमुख मुद्दे-

राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
राष्ट्रीय सुरक्षेला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर जशी पावले उचलली गेली तशाच प्रकारचे निर्णय राष्ट्राच्या सुरक्षेसाठी भविष्यातही घेतले जातील. घुसखोरांमुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

तिहेरी तलाक, हलालाविरुद्ध लढा
तिहेरी तलाक, निकाह हलाला यासारख्या कुप्रथा संपविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्याला सर्व पक्षांनी साथ द्यावी. महिलांना समान अधिकार मिळण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

जीएसटी सुलभ करणार
कृषीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यात येणार असून, उद्योजकांना तारणमुक्त कर्जे देण्याचा तसेच जीएसटी आणखी सुलभ करण्याचे प्रयत्न होतील. अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणखी आर्थिक सुधारणाही केल्या जातील.

शांततेचे प्रयत्न
जम्मू-काश्मीरमध्ये शांतता व सुव्यवस्था नांदण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करीत आहे. काश्मीरमध्ये पंचायत व लोकसभेच्या निवडणुका नीट पार पाडण्याचे सरकारचे प्रयत्न यशस्वी झाले.

नवे औद्योगिक धोरण
उद्योगधंद्यांचा विकास तसेच रोजगारांच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी नवे औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करू. भारताला जागतिक उत्पादनांचे केंद्र बनविण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

मतदारांच्या आशा-आकांक्षा
खासदारांनी अशा पद्धतीने कामे करावीत की, त्यापासून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. मतदाराच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणे हे खासदाराचे कर्तव्य आहे. त्याचे त्यांनी पालन केले पाहिजे.

कावेरी प्रश्न द्रमुककडून उपस्थित
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण सुरू होताच द्रमुकच्या खासदारांनी कावेरी जलवाटपाचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक आणि तामिळनाडूतील हा तिढा लवकर सोडवावा, अशी मागणी या खासदारांनी केली.

Web Title: National Security will give highest priority; President's address, Ramnath Kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.